Madhu Mantena Ira Trivedi Wedding : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-निर्माता मधु मंटेना (Madhu Mantena) आणि योग प्रशिक्षक इरा त्रिवेदीबरोबर (Ira Trivedi) दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर चदला आहे. (Madhu Mantena Ira Trivedi Wedding) मधु आणि इराच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहेत. (Photo viral) वयाच्या 48 व्या वर्षी मधु मंटेना आणि इरा त्रिवेदीसोबत लग्नबंधनात अडकला आहे.
इरा त्रिवेदीने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये इरा आणि मधु हे रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. इराने फोटो शेअर करत खास कॅप्शन दिले आहे. इरा आणि मधुच्या या फोटोवर सेलिब्रिटींसह अनेक चाहते मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. खूप खूप अभिनंदन, पुढील नव्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा, तुम्हा दोघांसाठी खूप आनंदी आहे, अशा मोठ्या प्रमाणात कमेंट्स चाहत्यांनी केले आहेत.
मधु मंटेनाने फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताबरोबर (Masaba Gupta) 2015 साली लग्न केतर होते. परंतु, त्यांचं नातं खूपकाळ काही टिकलं नाही. लग्नानंतर ४ वर्षांनी दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मसाबा जानेवारी 2023 मध्ये ‘बॉम्बे वेलवेट’ फेम सत्यदीप मिश्राबरोबर लग्नबंधनात अडकली होती. परंतु आता सत्यदीप आणि मसाबा दोघांचही हे दुसरं लग्न असल्याचे सांगितले जात आहे. आदिती राव हैदरीबरोबर सत्यदीपने अगोदर लग्न केले होते.
मधु-इराच्या लग्नसोहळ्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यामध्ये सोनाली बेंद्रे, गोल्डी बहल, ऋतिक रोशन, सबा आजाद, हुमा कुरैशी, जहीर इकबाल, सोनाक्षी सिन्हा, राजकुमार राव, पत्रलेखा, अनुपम खेर, अनिल कपूर, राकेश रोशन, अल्लू अर्जुन, अलाया एफ, आशुतोष गोवारिकर, राहुल बोस, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, मधुर भंडारकर, कार्तिक आर्यन, रकुल प्रीत सिंह, जिनिलिया देशमुख या सेलिब्रिटींचा यांच्या लग्नाला हजेरी लावली होती.
मधु मंटेनाने ‘क्वीन’,’गजनी’, ‘एनएच 10’, ‘मसान’ आणि ‘लुटेरा’सारख्या हटके चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे इरा ही योग प्रशिक्षक असण्याबरोबरच एक लेखिका देखील आहे. ‘योग लव’ या संस्थेची ती संस्थापिका आहे. योगासंबंधित अनेक व्हिडीओ इरा ही युट्यूबवर शेअर करत असते. इराचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.