Gufi Paintal : ‘महाभारता’तील शकुनी मामाच्या प्रकृतीबाबत आली मोठी अपडेट

Gufi Paintal Health Update: ‘महाभारत’ (Mahabharata) या ऐतिहासिक टीव्ही सीरियलमध्ये शकुनी मामाची (Shakuni Mama) भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते गूफी पेंटल (Gufi Paintal ) याना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Gufi Paintal Health Update) गूफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याचं सांगितलं जात आहे. गूफी पेंटल यांची […]

Letsupp Image (29)

Letsupp Image (29)

Gufi Paintal Health Update: ‘महाभारत’ (Mahabharata) या ऐतिहासिक टीव्ही सीरियलमध्ये शकुनी मामाची (Shakuni Mama) भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते गूफी पेंटल (Gufi Paintal ) याना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Gufi Paintal Health Update) गूफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असल्याचं सांगितलं जात आहे. गूफी पेंटल यांची महाभारतातील शकूनी मामाची भूमिका प्रचंड गाजली होती.

शकूनी मामा म्हणजेच गूफी पेंटल असे चित्र त्यावेळी निर्माण झाले आहे. महाभारतानंतर पेंटल यांनी अनेक सिनेमा आणि सीरियल्समध्ये काम केले आहे. पण शकूनी मामा हीच त्यांची ओळख कायम राहिली होती. लोकांना अजून देखील त्यांचं खरं नाव माहीत नाही. त्यांना आज देखील शकूनी मामा म्हणूनच ओळखले जाते. गूफी पेंटल यांची प्रकृती खराब झाल्यावर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.


मात्र आता त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असल्याची माहिती आहे. ते उपचाराला साथ देत आहे. डॉक्टरांनी देखील त्यांच्या तब्येतीची अपडेट दिली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. आता त्यात थोडी सुधारणा झाली असल्याची माहिती समोर आली आहे, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत बरी व्हावी, म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

पेंटल यांनी सीरिअल्स शिवाय सुहाग, दावा, देश परदेस, घूम आदी सिनेमातही काम केले आहे. त्यांनी मोठ्या पडद्यावर वडिलांच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पेंटल यांनी काही सिनेमांची निर्मिती देखील केली होती. 1993 मध्ये त्यांची पत्नी पेखा पेंटल यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ते एकाकी पडले होते. मात्र, त्यानंतर देखील त्यांनी सिनेमा आणि सिरीयलमध्ये काम सुरू ठेवले होते.

Exit mobile version