Mahesh Manjarekar on Hi Anokhi Gath : महेश मांजरेकर ( Mahesh Manjrekar ) दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ ( Hi Anokhi Gaath Movie) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या निमित्त लेट्सअप मराठीने या टीमसोबत खास संवाद साधला. यावेळी महेश मांजरेकर आणि श्रेयसचा लाईफ फंडा त्यांनी शेअर केला. मात्र यावेळी मांजरेकर यांनी आपण प्रामुख्याने नाते संबंधांवर आधारितच चित्रपट का बनवतो या मागची त्यांची स्ट्रॅटेजी सांगितली. काय म्हणाले महेश मांजरेकर पाहूयात…
मॅकडोनाल्डने ‘चीज’ शब्दच हटवला! अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर बदल
संबंधांवर आधारितच चित्रपट का बनवतो? यावर बोलताना मांजरेकर म्हणाले की, मी जे चित्रपट बनवतो त्या चित्रपटांची ताकद हे नातेसंबंध असतात. माझ्या चित्रपटांमध्ये नेहमी नातेसंबंधांमधून घडणाऱ्या गोष्टी दाखवल्या जातात. ज्यामध्ये वास्तव, अस्तित्व, जिस देश मे गंगा रहता है, लालबाग परळ, काकस्पर्श, नटसम्राट, वरण-भात लोणचं कोण नाही कोणचं, प्राण जाय पर शान ना. या सर्व चित्रपटांची ताकद होती त्यातील नातेसंबंध.
‘आर्टिकल 370’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी चित्रपटाने केली ‘इतकी’ कमाई
त्यामुळे मी जे नातेसंबंध पाहिले आहेत. अनुभवले आहेत. त्यावरच आधारित माझे चित्रपट असतात. त्यामुळे मी व्यावसायिक चित्रपट बनवू शकत नाही. तसेच मी माझे सर्व चित्रपट मी स्वतः लिहिलेले आहेत. चित्रपट लिहिण्याअगोदर मी त्याची कथा आसपासच्या लोकांना ऐकवतो. त्यांना त्यामध्ये काहीतरी चांगलं जाणवलं तरच मी ते चित्रपट पुढे नेतो. मग माझे चित्रपटाचे लेखन हे एका दिवसाचे पूर्ण होतं. मात्र कथेमध्ये जर दमदारपणा नसेल तर मी आणि चित्रपट सोडले देखील आहेत.
त्यामध्ये नुकतेच येणाऱ्या ही अनोखी गाठ बद्दल सांगायचं झालं तर हा चित्रपट एका हळव्या पण संवेदनशील मनाच्या पुरूषाची कथा आहे. ही चित्रपटातील मुख्य भूमिका आहे. जी श्रेयस तळपदेने निभावलेली आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षक आणि विशेषतः महिला वर्गाला आपलं हे पात्र नक्की भावेल असा विश्वास यावेळी मांजरेकर यांनी व्यक्त केला.