Download App

महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे पहिल्यांदाच दिसणार एकत्र, ‘या’ चित्रपटात करणार काम…

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) देवमाणूस (Devmanus) चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत.

  • Written By: Last Updated:

Devmanus Film : मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) देवमाणूस (Devmanus) चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. त्यांच्या तीन दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत प्रथमच ते चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. आगामी देवमाणूस हा मराठी चित्रपट असून याचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देवस्कर करणार आहेत.

विरोधकांचा आता सूर बदलला! EVM मुळे नाही तर लाडक्या बहिणींनीच गेम केला 

नटसम्राट आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यांसारख्या चित्रपटांतील आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे महेश मांजरेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा चांगलाच उमटवला आहे. इंटेन्स ड्रामाने भरपूर अशा भूमिकांपासून ते पावरफुल ॲक्शन-पॅक व्यक्तिरेखा साकारत महेश मांजरेकरांनी मनोरंजन विश्वात अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली. दुसरीकडे अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी हम आपके है कौन, अबोली, जानिवा यांसारख्या चित्रपटांत दमदार अभिनय करून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रातील त्यांची कारकीर्द वाखान्याजोगी आहे.

ब्रिस्बेनमध्ये टीम इंडिया देणार ऑस्ट्रेलियाला धक्का, रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय 

अभिनेते महेश मांजरेकर ह्यांनी ह्या सिनेमा बद्दल आपले मत व्यक्त करताना सांगितले, देवमाणूस सारख्या चित्रपटामध्ये रेणुकासोबत काम करणे हा माझासाठी एक खूप बहुप्रतिक्षित सर्जनशील प्रवास वाटतो. मी सध्या या नव्या चित्रपटाबाबत खूपच उत्साहीत आहे. मला आशा आहे की, आपले प्रेक्षक सुद्धा आमच्या नव्या सिनेमाबद्दल उत्साह दाखवतील.

तर अभिनेत्री रेणुका शहाणे म्हणाल्या, देवमाणूसच्या निमित्ताने मी महेश सोबत जरी पहिल्यांदा काम करत असले तरी आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतोय, त्यामुळे असं वाटलंच नाही की आम्ही यापूर्वी एकत्र काम केल नाहीये. मला खात्री आहे ‘देवमाणूस’ बघून प्रेक्षकांना काहीतरी दमदार बघितल्याचं समाधान मिळेल. खूप वर्षांनी मला मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळालीये, त्याचा विशेष आनंद होतोय.

बहुचर्चित तेजस प्रभा विजय देवस्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट, रकुल प्रीत सिंग सोबत छत्रीवाली यासारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

देवमाणूस सिनेमात दिग्गज कलाकार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी एक जबरदस्त मेजवानी ठरणार आहे.

follow us