Download App

‘ॲनिमल’ नंतर आता अजय देवगणचा ‘मैदान’ सिनेमावर जावेद अख्तर पुन्हा बोलले

Javed Akhtar On Maidan Ajay Devgan: सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) ‘मैदान’ हा (Maidan Movie) चित्रपट प्रदर्शित झाला. आगाऊ बुकिंगमध्ये या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला असून त्याचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकतचं या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यात चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज आले होते. हा चित्रपट पाहण्यासाठी बॉलिवूडचे गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तरही (Javed Akhtar) आले होते. हा चित्रपट आवडला की नाही, याबद्दल त्यांनी थेटच सांगितलं आहे.

जावेद अख्तर हे अशा व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत, जे अगदी सडेतोड वक्तव्य करत असतात. अलीकडेच त्याने रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ॲनिमल या चित्रपटावर निशाणा साधला होता आणि चित्रपटाबद्दल सडेतोड वक्तव्य करताना पाहायला मिळाले आहे. ते नेहमीच प्रामाणिक रिव्ह्यू देण्यासाठी ओळखले जातात. आता त्यांनी अभिनेता अजय देवगणचा मैदान पाहिला आहे, ज्याचे स्पेशल स्क्रिनिंग नुकतेच मुंबईत पार पडले. हा चित्रपट त्यांना खूपच आवडल्याने त्यांनी अजयचे तोंडभरून कौतुक केले आहे.

चित्रपटाचे कौतुक करताना त्याने त्याच्या X खात्यावर लिहिले आहे की, मी मैदान पाहिले. हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे जो प्रत्येक भारतीयाला त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल ज्याची दुर्दैवाने अनेकांना माहिती नाही. पाहावा असा चित्रपट. चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर, दिग्दर्शक अमित शर्मा आणि अजय देवगण यांचे खूप खूप अभिनंदन ज्यांनी जबरदस्त अभिनय केला.

टायगर श्रॉफने ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मधील त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना लावलं ‘वेड’

चित्रपटाबद्दल बोलायचे तर हा चित्रपट 11 एप्रिल 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा माजी फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. अजय देवगण व्यतिरिक्त प्रियामणी, गजराज राव आणि नितांशी गोयल या कलाकारांनी चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटासोबतच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे आणि बॉक्स ऑफिसवर बंपर कमाईचा दावा करताना दिसत आहे.

follow us

वेब स्टोरीज