Majha Sonyacha Tukda: भरपावसाळ्यात प्रेमाचं वर्षाव करणारं अस्सल मराठमोळं गाणं रिलीज ! एकदा पाहाच…

Majha Sonyacha Tukda: दिक्षा टी क्रिएशन निर्मित ‘माझा सोन्याचा तुकडा’ (Majha Sonyacha Tukda) या गाण्याने तरुणांना चांगलीच भुरळ पाडली आहे. (Marathi song) रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक मनोरंजनाचा डोस घेऊन या गाण्याला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच भरपावसाळ्यात प्रेमाचं वर्षाव करणारं अस्सल मराठमोठं गाणं चाहत्यांच्या चांगलंच पसंतीत उतरत आहे. (Diksha T Creation) या गाण्याचे बोल माझ्या […]

Majha Sonyacha Tukda

Majha Sonyacha Tukda

Majha Sonyacha Tukda: दिक्षा टी क्रिएशन निर्मित ‘माझा सोन्याचा तुकडा’ (Majha Sonyacha Tukda) या गाण्याने तरुणांना चांगलीच भुरळ पाडली आहे. (Marathi song) रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात एक मनोरंजनाचा डोस घेऊन या गाण्याला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच भरपावसाळ्यात प्रेमाचं वर्षाव करणारं अस्सल मराठमोठं गाणं चाहत्यांच्या चांगलंच पसंतीत उतरत आहे. (Diksha T Creation) या गाण्याचे बोल माझ्या सोन्याचा टुकडा.. असे आहे. रोहित पाटील आणि भूमी काळबेरेच्या आवाजातील या गाण्याची तरुणांना चांगलीच भुरळ पडत असल्याचे दिसून येत आहे.

या गाण्याचे दिग्दर्शन आणि निर्माते दीक्षा टेकम यांनी केले आहे. तर स्टारिंग आकाश मुनफन यांनी केले आहे. या गाण्याचे गायक रोहित पाटील, भूमी काळबेरे, संगीत रोहित पाटील तर संगीत अरेंजर हे नवीन मोरे आहेत. या गाण्याचे रेकॉर्डिंग सुरोहित म्युझिक स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे. तसेच या गाण्याची लेखिका आणि दिग्दर्शक दीक्षा टेकम, छायाचित्रण संचालक संदिप वाटवे, व्हिडिओ शूट दीप, राज आणि व्हिडिओ संपादन केडी व्हीएफएक्स कर्तव्य मोकल तर नृत्य दिग्दर्शन हे केतन पाटील, मेकअप आणि केस कांचन पाटील, मृणाली कांबळे, सोनू पाटील, अपेक्षा पाटील यांनी काम पहिले आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

तसेच पोशाख, फॅशन जग तर सहाय्यक कलाकार म्हणून सोनू पाटील यांनी काम पाहिले आहे. या मराठी गाण्याने सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वेड लावले आहे. आश्चर्य म्हणजे या मराठी गाण्याला प्रेक्षकही या ताल धरु लागले आहेत. बॉगं सुरु होताच तुम्हाला देखील डान्स करण्याचा मोह आवरला जाणार नाही. तसेच या दर्जेदार गाण्याने सर्वांचे मने जिंकले आहेत. गाण्याचे बोल माझ्या सोन्याचा टुकडा असे आहे.

रोहित पाटील आणि भूमी काळबेरेच्या आवाजातील या गाण्याची तरुणांना भुरळ पडत आहे. त्यांच्या गाण्याने टाळ्या, शिट्ट्या वाजत आहेत. दिक्षा टी क्रिएशन निर्मित हे गाणं अलिबागमध्ये शूट करण्यात आले आहे. तसेच एक ठेका धरायला लावणारा ‘माझा सोन्याचा तुकडा’ हे गाणं प्रदर्शित झाले असून हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे.

Exit mobile version