IPL RR vs CSK Malaika Arora : आयपीएल 2025 च्या हंगामात काल (30 मार्च) चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यावेळी बॉलिवूड अभिनेत्री मलायका (Malaika) अरोरा दिसून आल्याने चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
राजस्थान रॉयल्स
राजस्थान आणि चेन्नईचा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा देखील उपस्थित होती. मलायका राजस्थान रॉयल्सची जर्सी घालून संघ संचालक कुमार संगकाराच्या शेजारी बसलेली दिसली.
अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप? मलायका अरोराने रिलेशनशिप स्टेटसचा केला खुलासा केला, माझं स्टेटस
मलायकाला पाहून पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या डेटिंगची चर्चा रंगली आहे. मलायका जास्त क्रिकेटच्या मैदानात दिसत नाही. मात्र, अचानाक राजस्थानची जर्सी घालून सामना पाहण्यासाठी उपस्थिती लावल्याने सोशल मीडियावर मलायकाबाबत विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत
अर्जुन कपूरचे ब्रेकअप-
मलायका अरोरा आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झालं आहे. अर्जुन कपूरच्या आधी मलायकाचं लग्न अरबाज खानशी झालं होतं. परंतु, 17 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.