Download App

Kollam Sudhi: प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्याचं कार अपघातात निधन; अन्य तीन कलाकार गंभीर जखमी

Kollam Sudhi Accident: मनोरंजन सृष्टीतून एकापाठोपाठ एक वाईट बातम्या समोर येत आहेत. आदित्य सिंग राजपूत ते वैभवी उपाध्याय यांच्यासह अनेक स्टार्सच्या अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे झालेल्या मृत्यूने सर्वांना मोठा धक्का बसला होता. तर काल रात्री म्हणजे ४ जून रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना (Actress Sulochna Latkar ) यांनी देखील जगाचा निरोप घेतला आहे. तर आता इंडस्ट्रीतून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.


मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी (kollam sudhi) यांच्या कारचा भीषण अपघात (Terrible Accident) झाला आणि या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात अन्य तीन कलाकार देखील जखमी झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 37 वर्षीय कोल्लम सुधी यांच्या कारला सोमवारी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास त्रिशूरमधील कपमंगलम या ठिकाणी अपघात झाला आहे.

सुधी वाटकारा येथील कार्यक्रमानंतर कोल्लम घरी परतत होते आणि कॉमेडियन बिनू आदिमाली, उल्लास आणि महेश यांच्यासोबत होते. कोल्लम सुधी यांची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहकाला जोरदार धडकली. या अपघातात कोल्लम सुधी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना थिसुरमधील कोडुंगल्लूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे, बिनू आदिमाली, उल्लास आणि महेश हे देखील अपघातात गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोल्लम सुधीने 2015 मध्ये रिलीज झालेल्या ‘कंथारी’मधून सिनेमासृष्टीत पदार्पण केले होते. ‘कट्टापनायाले ऋत्विक रोशन’, ‘कुट्टनादन मारप्पा’, ‘थिटा रप्पई’, ‘वकाथिरिवू’, ‘अॅन इंटरनॅशनल लोकल स्टोरी’, ‘एस्केप’, ‘केसू ए वेदिंटे नाधान’ आणि ‘स्वर्गथिले कत्तुरुम्बू’ यांसारख्या अनेक सिनेमामध्ये तो दिसला होता. आता त्यांच्या आकस्मिक निधनाने सिनेमासृष्टीत मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags

follow us