पर्वतांच्या कुशीत सुरू होणार ‘मना’चे श्लोक’ चा प्रवास; ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

Manache Shlok या चित्रपटातून पर्वतांची साथ आणि मनाच्या नात्यांची ऊब मिळाली तर तो प्रवास खास ठरतो. अशीच एक वेगळी गोष्ट पाहायला मिळणार आहे

Letsupp Marathi (1)

Letsupp Marathi (1)

Manache Shlok Marathi Film Will Release Soon : आयुष्य हा एक प्रवास आहे, कधी सोपा, कधी कठीण, तर कधी भावनांनी भरलेला. या प्रवासाला पर्वतांची साथ आणि मनाच्या नात्यांची ऊब मिळाली तर तो प्रवास खास ठरतो. अशीच एक वेगळी गोष्ट ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Video : उद्यापासून ऐकणार नाही, जरांगेंचा फडणवीसांना 48 तासांचा अल्टिमेटम, मुंबईत धडकण्याचा मार्गही सांगितला

या चित्रपटात मनवा आणि श्लोक यांचा प्रवास दाखवला असून, त्यात त्यांची नाती, विचार आणि स्वप्नं यांचा सुंदर संगम दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये ते दोघे पर्वतांच्या दिशेने चालत निघाल्याचं दिसत असून, त्यांचे पाठमोरे रूप या प्रवासाच्या कहाणीची उत्सुकता वाढवतं. या प्रवासात त्यांचं प्रेम फुलणार का, त्यांच्या सोबत आणखी कोण असेल, ते काय मागे सोडून आले आहेत आणि डोंगर त्यांना कोणत्या नव्या दिशेने नेत आहेत, हे जाणून घेणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे.

5 हजार कोटींचा सिडको घोटाळा! शिरसाट राजीनामा द्या… बॅगभर पुरावे, पेनड्राईव्हसह रोहित पवारांचा हल्लाबोल

या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब यांची भूमिका आहे. ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून, याचे लेखन व दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा असून, हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स व नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांनी सादर केला आहे.

Exit mobile version