Video : उद्यापासून ऐकणार नाही, जरांगेंचा फडणवीसांना 48 तासांचा अल्टिमेटम, मुंबईत धडकण्याचा मार्गही सांगितला

Manoj Jarange on Maratha Reservation Protest at Mumbai : गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी मुंबईमध्ये जाण्याची योजना आखली आहे. त्यामध्ये त्यांनी सरकारकडे आरक्षणासह इतर मागण्या केल्या. तसेच सरकारला आमरण उपोषणाचा इशारा देत फडणवीसांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच त्यांनी मुंबईत धडकण्याचा मार्गही सांगितला आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे?
आम्ही शाहगड-पांढरी पूल-आळे फाटा-शिवनेरी गड येथे मुक्काम करणार आहोत. त्यानंतर आम्ही 28 आगस्टला संध्याकाळी मुंबईला आजाद मैदानवर जाऊ. त्या अगोदर आजच्या पत्रकार परिषदेतून सरकारला इशारा देत आहोत. की, 29 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरु होणार आहे. यावेळी आम्हाला कोणीही आडवं येणार नाही. कारण आमच्या नोंदी सापडल्या आहेत. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता मुंबईसाठी निघणार आहोत. तर आम्ही यावेळी आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार आहोत. अशी घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे.
तसेच ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे. त्यासाठी सगे सोयरे यांच्यासह आरक्षणाचा आदेश द्या. आम्हाला न्यायासाठी जायचं आहे. कोणाला त्रास द्यायचा नाही. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मराठा-कुणबी एक आहेत, हा अध्यादेश काढा. असं म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. आजची पत्रकार परिषद ही शेवटची आहे उद्या पासून मी बोलणार नाही. सरकारच्या हातात 2 दिवस आहेत. आडमुठी भूमिका सोडावी. मराठा आणि कुणबी एकच आहेत, सरकारने मान्य करावं. सातारा, औंध आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झालीच पाहिजे, हैदराबाद गॅझेट सरकारने स्वीकारलं पाहिजे, फडणवीसांचं नाही ऐकायला आम्ही तयार नाही. असंही यावेळी जरांगे म्हणाले आहेत.
दीड वर्ष वेळ दिला, पण सग्यासोयऱ्याच्या आदेशाची अंमलबजावणी नाही. १५० वर्षांपूर्वीच्या कुणबी असल्याच्या नोंदी मिळाल्या आहेत. सग्यासोयऱ्यांची अधिसूचना काढली पण दीड वर्ष वेळ देऊनही सग्यासोयऱ्याच्या आदेशाची अंमलबजावणी नाही. जे बांधव आरक्षणाच्या लढ्यात दगवले त्यांना नोकरी द्या. जर आरक्षण नाही दिल तर मी सत्ता उलथून टाकीन. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. आरक्षण मिळाल्यास तुम्हाला डोक्यावर घेऊ. आम्हाला शेती करायला कोणतीही लाज वाटत नाही. 10 टक्के आरक्षण म्हणजे भाड्याचं घर, कधीही जाईल. मराठा आणि कुणबी एकच हा जीआर हवाय. मराठा समाज फार संयमाने वागलाय. 4 महिन्यांपूर्वी आम्ही मुंबईत आंदोलनात घोषणा केली होती. पण चार महिने सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. अंतरवालीत या असं फडणवीसांना सांगितलं होतं. फडणवीसांनी आडमुठेपणा करू नये. हैदराबाद गॅझेटवर तुम्ही 13 महिन्यांपासून अभ्यास करत आहात. दोन दिवसांत आरक्षण द्या, मुंबईत यायची गरज भासणार नाही. संविधानात बसणारं आरक्षण द्या. फडणवीसांना आज आणि उद्या.. दोन दिवसांची संधी देतो.