5 हजार कोटींचा सिडको घोटाळा! शिरसाट राजीनामा द्या… बॅगभर पुरावे, पेनड्राईव्हसह रोहित पवारांचा हल्लाबोल

5 हजार कोटींचा सिडको घोटाळा! शिरसाट राजीनामा द्या… बॅगभर पुरावे, पेनड्राईव्हसह रोहित पवारांचा हल्लाबोल

Rohit Pawar Demands Remove Sanjay Shirsat From His Post : आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) पुन्हा एकदा मोठा राजकीय गौडबंगाल उकरून काढलं आहे. काही दिवसांपूर्वी शिरसाट (Sanjay Shirsat) सीडकोचे अध्यक्ष असताना झालेल्या 5 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही पत्रकार परिषद घेतली होती, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी आम्ही सीडको कार्यालयात जाऊनही (5 thousand crores CIDCO corruption) चर्चा केली होती, असे पवारांनी स्पष्ट केले.

रोहित पवार म्हणाले –

“भिमाशंकरचे महादेव आम्हाला सद्बुद्धी देवो, असे शिंदे साहेब आम्हाला म्हणाले होते. पण आम्हाला महादेवानेच बुद्धी अन् ताकद दिली आहे म्हणून आम्ही लढतो आहोत. फडणवीस साहेब म्हणाले की पुराव्याशिवाय बोलू (Maharashtra Politics) नका. पण आम्ही गाडीभर नाही, तर बॅगभर पुरावे आणि पेनड्राईव्ह घेऊन आलो आहोत. त्यामुळे सरकारने कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा आहे.

Video : जगदीप धनखड नजरकैदेत?; राजीनाम्यासाठी दबाव; शाहंच्या उत्तराने सस्पेन्स संपला…

बिवलकर कुटुंब, जमीन आणि सीडकोचा अहवाल

या प्रकरणात बिवलकर कुटुंबाने लेखी स्वरूपात दिले होते की, आम्ही खोटे ठरलो तर जमीन सीडकोला देऊ. आता तेच खोटे ठरले असून त्यांनी ती जमीन सरकारला दिली आहे, असे पवार म्हणाले. तरीदेखील शिंदे साहेबांच्या विभागाने दिलेला प्रस्ताव चुकीचा असून, 5 मार्चचा ठराव अनधिकृत आहे, असेही त्यांनी नमूद केले. सीडकोने स्वतःच्या अहवालात या निर्णयाला विरोध दर्शवला होता. तीन वेळा ही मागणी फेटाळण्यात आली होती. तरीदेखील शिरसाट यांची एन्ट्री करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात एक भूमिका आणि राज्यात वेगळी भूमिका कशी? असा सवाल पवारांनी उपस्थित केला.

सर्वोच्च न्यायालयाचा अपमान?

प्रकरण कोर्टात असताना असे भूखंडांचे वाटप करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान नाही का? असा थेट सवाल पवारांनी फडणवीस यांना केला. यासोबतच त्यांनी अनधिकृत बांधकामांबाबतही इशारा दिला, काही बिल्डर यांनी तिथे इमारती बांधायला सुरुवात केली आहे. पण अशा अनधिकृत इमारती लोकांनी घेऊ नयेत, कारण त्या कधीच पूर्ण होणार नाहीत.

पहिला अंतराळवीर कोण? प्रश्नावर विद्यार्थी चुकलेच, पण… मंत्रीमहोदयांचं उत्तर ऐकून हसू थांबणार नाही!

बुलेट ट्रेनपेक्षा वेगवान फाईल!

या प्रकरणातील फाईलची वेगाने झालेली हालचाल पवारांनी उघड केली. लोकांसाठी अनेक योजनांच्या फाईल महिनोंमहिने मंत्रालयात फिरत नाहीत. पण ही 5 हजार कोटींची फाईल बुलेट ट्रेनपेक्षा वेगात फिरली. 10 ऑक्टोबरला मंत्रालयातील 7 ते 8 टेबल, तर सीडकोतील 15 ते 20 टेबल अशा तब्बल 40 टेबलवरून एका दिवसात ही फाईल पास झाली.

शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी

फडणवीस साहेब या प्रकरणी काय करतात, ते आम्ही पाहणार आहोत. पण शिरसाट यांना त्यांच्या पदावरून काढा. एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारावर झाक घालणाऱ्याला खुर्चीवर बसवणं अयोग्य आहे. सर्वोच्च न्यायालयात मजबूत वकिल नेमा. आम्ही स्पष्ट मागणी करतो की शिरसाट यांनी राजीनामा द्यावा, असं रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube