Video : जगदीप धनखड नजरकैदेत?; राजीनाम्यासाठी दबाव; शाहंच्या उत्तराने सस्पेन्स संपला…

  • Written By: Published:
Video : जगदीप धनखड नजरकैदेत?; राजीनाम्यासाठी दबाव; शाहंच्या उत्तराने सस्पेन्स संपला…

Amit Shah On Jagdeep Dhankhar Resignation : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजीनामा दिल्यानंतर अज्ञातवासात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर, धनखड (Jagdeep Dhankhar) यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. विरोधकांच्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी धनखड यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच थेट भाष्य करत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत शाह बोलत होते.

जगदीप धनखर नजरकैदेत? शाहंचं उत्तर काय?

जगदीप धनखड यांना नजरकैदेत ठेवण्याच्या विरोधकांच्या दाव्यांबद्दल अमित शहा यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, जगदीप धनखड हे संवैधानिक पदावर होते आणि त्यांनी संविधानानुसार आपली कर्तव्ये पार पाडली. वैयक्तिक आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला असे सांगत कोणीही जास्त ताण देऊन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू नये.

राहुल गांधींनी उपस्थित केले होते प्रश्न

गेल्या आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धनखड यांच्या अचानक गायब होण्यावरून सरकारवर निशाणा साधत माजी उपराष्टपती कुठे गेले? असा सवाल उपस्थित केला होता. तसेच ‘आपण मध्ययुगीन काळात परत जात आहोत जेव्हा राजा कोणालाही मर्जीने काढून टाकू शकत होतो. निवडून आलेली व्यक्ती काय असते याची कोणतीही संकल्पना नाही. त्याला तुमचा चेहरा आवडत नाही, म्हणून ईडीला गुन्हा नोंदवण्यास सांगितले आणि नंतर लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या व्यक्तीला ३० दिवसांच्या आत काढून टाकले जाते. आपण नवीन उपराष्ट्रपची का निवडत आहोत हे विसरू नका असे म्हणत माजी उपराष्ट्रपती नेमके कुठे गेले याबद्दल कुणाला काही माहिती आहे का?

२१ जुलैला धनखडांना राजीनामा

जगदीप धनखड यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २१ जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की, आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करण्यासाठी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे नमुद केले होते. धनखड यांच्या अचानक राजीनाम्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता शाह यांनी विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर थेट उत्तर देत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube