Download App

यंदाचा कान्स फेस्टिवल असणार खास; रेड कार्पेटवर अवतरणार Manushi Chhillar

Manushi Chhillar will on Red Carpet of Cannes : यंदाचा कान्स फेस्टिवल ( Cannes Festival ) खास असणार आहे. कारण या वर्षी या रेड कार्पेटवर ( Red Carpet ) बॉलिवूडची प्रॉमिसिंग स्टार मानुषी छिल्लर ( Manushi Chhillar ) हजेरी लावणार आहे. यामध्ये मानुषी अनेक कमालीच्या लूक्स सोबत या फेस्टिवल मध्ये दिसणार आहे.

विशाल पाटलांचं नाव येताच ठाकरे भर पत्रकार परिषेदत म्हणाले, “त्यांनी बंडखोरी केली..”

या बद्दल मानुषी म्हणते “मी एवढं खात्रीशीर सांगू शकते की काहीतरी प्रायोगिक नक्कीच असणार आहोत आणि गेल्या वर्षीच्या ग्लॅमर लुकपेक्षा यावर्षीचे लूक्स पूर्णपणे वेगळे असणार आहोत. या वर्षी मला एंजल लूक्स या थीमवर काम करायचे आहे जे कमालीचं सुंदर आहे. मिस वर्ल्ड बनलेल्या अभिनेत्रीने सांगितले की ती महोत्सवाच्या 77 व्या फेस्टिवल मध्ये सहभागी होण्यासाठी “उत्साहीत” आहे. ती पुढे म्हणाली की अशा जागतिक कार्यक्रमाचा भाग बनणे “नेहमी मजेदार” असते.

त्यांना कॉंग्रेसही विचारत नाही, मी त्यांच्याशी का बोलावं? आंबेडकरांनी चव्हाणांचं स्टेटसच काढलं

वर्क फ्रंटववर मानुषी शेवटची ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मध्ये दिसली होती ज्यामध्ये तिला ‘कॅप्टन मीशा’ म्हणून तिच्या अभिनयासाठी प्रशंसा मिळाली होती. अभिनेत्री आता ‘तेहरान’ च्या रिलीजची वाट पाहत आहे, ज्यामध्ये ती जॉन अब्राहमसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.

दरम्यान ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ ( Operation Valentine ) या चित्रपटामध्ये दक्षिणात्य अभिनेता वरूण तेज आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर या ॲक्शन फिल्ममध्ये एअर फोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा मानुषीचा पहिला तेलगू चित्रपट असणार आहे. यामध्ये देशभक्ती दाखवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर त्यानंतर ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

follow us

वेब स्टोरीज