त्यांना कॉंग्रेसही विचारत नाही, मी त्यांच्याशी का बोलावं? आंबेडकरांनी चव्हाणांचं स्टेटसच काढलं
Prakash Ambedkar Criticize Prithviraj Chavhan : महाविकास आघाडीसोबतची युतीची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) यांच्याकडून वारंवार कॉंग्रेसवर ( Congress) निशाणा साधण्यात येत आहे. याच दरम्यान आता आंबेडकर यांनी एका मुलाखतीमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavhan ) यांच्यावर टीका करताना त्यांचं स्टेटसच काढलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना कॉंग्रेसमध्ये कोणीही विचारत नाही. तसेच मी माझ्या स्टेटसच्या व्यक्ती बरोबर बसतो. असं म्हणत आंबेडकरांनी चव्हाणांवर निशाणा साधला आहे.
Gaurav More: ‘तूही मेरी किरण…’ गौरवने जूहीसाठी केली अफलातून जुगलबंदी; पहा व्हिडीओ
नुकतीच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसोबतच्या युतीवर आपली प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी आंबेडकरांनी पृथ्वीराज चव्हाणांवर देखील टीका केली. ते म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण कोण आहेत? त्यांना कॉंग्रेसमध्ये कोणीही विचारत नाही. त्यामुळे त्यांच्याशी मी का बोलावं? मी माझ्या स्टेटसच्या व्यक्ती बरोबर बसतो. ते केवळ माजी मुख्यमंत्री होते. मात्र त्यांच्याकडे कसलेही अधिकार नाहीत. दरम्यान आघाडीशी चर्चा सुरू असताना आंबेडकरांना कॉंग्रेस नेत्यांकडून आपल्याशी अंतर राखले जात असल्याचा आरोप केला होता.
हजारो कोटींच्या घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना दिलासा; निवडणुकीआधीच मिळाली क्लीनचिट
तसेच याच मुलाखतीमध्ये आंबेडकर म्हणाले की, कॉंग्रेसला ही निवडणूक जिंकायचीच नाही कारण त्यांना फक्त ईडी आणि सीबीआयपासून वाचायचे आहे. तसेच मी सांगितले देखील होते की, तुम्ही सर्व पक्षांना खरगेंच्या बाजूने एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र राहुल गांधींचा यामध्ये विचार केला जात नाहीय. त्यामुळे पक्ष उद्धवस्त होत आहे. त्यामुळे कॉंग्रेसला ममता बॅनर्जींचा तृणमूल आणि नितिश कुमारांनी सोडलं असंही यावेळी आंबेडकर म्हणाले.
राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर भाजपचा…
इंडिया आघाडीशी जागावाटपावरून फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी वेगळी वाट निवडली. त्यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले. तेव्हापासून ते सातत्याने कॉंग्रेसवर टीका करत आहे. त्यांनी अनेकदा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर निशाणा साधला. तर आता राहुल गाधींवर टीकास्त्र डागलं. राहुल गांधींचा स्क्रिप्ट रायटर भाजपचा असल्याची टीका त्यांनी केली.