Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सकल मराठा समाज बांधव दिवसेंदिवस अत्यंत आक्रमक होऊ लागला आहे. यातच मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आंदोलनं आणि उपोषणं केली जात आहेत. त्यातच आता सेलिब्रेटी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यात आई कुठे काय करते? या मालिकेतील अभिनेत्रीने देखील या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
महाराष्ट्रातील चार नेत्यांना बेळगाव बंदी; ‘काळा दिवस’ निमित्ताने सीमेवरील वातावरण पुन्हा तापणार?
आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला…
आई कुठे काय करते? या मालिकेत अनघा ही भूमिका साकरणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हीने मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी ती आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी झाल्याची दिसली. सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी ती मराठा आंदोलकांच्या उपोषणामध्ये सहभागी झाली. यासाठी तिने आपली भूमिका देखील मांडली. त्या संदर्भात तिने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर याबद्दल पोस्ट देखील केली.
Nitesh Rane यांचा जरांगेंना फोन; म्हणाले, आरक्षण मिळत राहिल तुम्ही…
लढ्याचा भाग होणे माझे कर्तव्य…
मराठा आंदोलकांच्या उपोषणामध्ये सहभागी झाली. त्याबद्दल तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर लिहिताना अभिनेत्री अश्विनी महांगडे म्हणाली की, आता नाही तर कधीच नाही… विद्यार्थी .. स्वप्नं… मेहनत… परीक्षा… उत्तीर्ण…. यश… तरीही अपयश… मग आक्रोश… यातना… मग परत परीक्षा…. मग परत सगळे तेच आधीचे पाढे… आणि मग आत्महत्या…. हे गेले किती तरी वर्ष सुरू आहे आणि या पुढे हे होणार नाही यासाठी उभे राहायला हवे. या लढ्यात मी भाग होणे हे माझे कर्तव्य आहे. असं तिने या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच तिने या आंदोलनाचा व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
मराठा आरक्षणाबद्दल रितेश देशमुखची खास पोस्ट
या अगोदर अभिनेता रितेश देशमुख याने देखील मराठा आरक्षणासाठी पोस्ट केली आहे. रितेश देशमुखनं ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो.” असे ट्विट अभिनेता रितेश देशमुखने यावेळी केले आहे.