Download App

भाऊ कदम अभिनयातून घेणार ब्रेक! कॉमेडीवीरच्या ‘त्या’ फोटोवरून चर्चांना उधाण

Bhau kadam Baba Look: उत्तम अभिनय शैलीद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणून भाऊ कदम (Bhau kadam) यांना ओळखले जाते. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामुळे ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. सध्या ते आपल्या आवडत्या कलाकाराची भेट व्हावी असं प्रत्येक चाहत्यांना वाटत असतंच. पण भाऊ कदम यांच्या दर्शनासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागतायेत हे ऐकून तुम्हाला देखील झटका बसणार आहे. त्यांचं दर्शन मिळावं यासाठी लोकांचे झुंबड उडत आहे. विश्वास बसणार नाही ना! मग ‘एकदा येऊन तर बघा’.

8 डिसेंबरला चाहत्यांच्या भेटीला येणाऱ्या ‘एकदा येऊन तर बघा’ या आगामी मराठी सिनेमात भाऊ कदम एका खास भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहेत. ‘बाबा गुलाबी गरम’ ही व्यक्तिरेखा ते यात साकारणार आहेत. अडचणीत असलेल्या भक्तांना मार्गदर्शन देणारे ‘बाबा गुलाबी गरम’ यांची लीला सिनेमात बघण्याची गंमत अनोखीच असणार आहे. लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करत आहे.

आपल्या भूमिकेविषयी भाऊ सांगतात की, ‘खूप मजेशीर अशी ही व्यक्तिरेखा आहे. हा ‘बाबा गुलाबी गरम’ चाहत्याचं मनसोक्त मनोरंजन करणार आहे, असा विश्वास ते व्यक्त करत आहेत. भाऊ कदम यांच्या सोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार असे तगडी विनोदवीर स्टार या सिनेमात आहेत.

Musafira Movie: मैत्रीची सुंदर सफर घडवणारा ‘मुसाफिरा’च्या पोस्टरचे दिमाखदार सोहळ्यात अनावरण

‘एकदा येऊन तर बघा’ मराठी सिनेमाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर यांची आहे. कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. मनोज अवना आणि कृपाल सिंग कार्यकारी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत. 8 डिसेंबरला ‘एकदा येऊन तर बघा’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us