Article 370 Film : 2022 मध्ये रिलीज झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची आजही चर्चा होते. असाच काश्मीर आणि विशेषत: कलम 370 वर भाष्य करणारा आणि ते कलम हटवण्यामागची खरी कहाणी मांडणारा ‘आर्टीकल 370’ (Article 370) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम स्टारर ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट आदित्य जांभळे (Aditya Jambhale) यांनी दिग्दर्शित केला. तर आदित्य धर यांची निर्मित आहे.
‘वडिलांच्या रक्तातच काँग्रेस, मी आहे तिथंच’; अमित देशमुखांनी ठणकावूनच सांगितलं
अलीकडेच या चित्रपटाचार ट्रेलर रिलीज झाला. तेव्हापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामी गौतम, प्रियामणी, अरुण गोविल या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात, यामीने एनआयए अधिकाऱ्याची भूमिका केली आहे जिला काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आणि कलम 370 रद्द केल्यानंतर दहशतवादी कारवाया अयशस्वी करण्याचे काम आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राचे लोक खूप कौतुक करत आहेत. या चित्रपटातील आणखी एक व्यक्तिरेखा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे अमित शाह.
Ritesh Deshmukh : ‘कंठ दाटला, डोळे भरून आले’.. वडिलांच्या आठवणीने रितेशला रडू कोसळलं
या चित्रपटात मराठमोळा अभिनेते किरण करमरकर यांनी अमित शाह यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्यांनी हुबेहुब अमित शाह यांच्या सारखाच गेटअप केला आहे. या भूमिकेसाठी चाहते किरण करमरकर यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्या ट्रेलरमधील छोट्याशा झलकेवरील रील्स प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या रिल्सचा वापर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केला जात आहे.
या चित्रपटात काश्मीरमधील ‘कलम ३७०’ हटवल्याच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. या ऐतिहासिक निर्णयामागे काम करणाऱ्या सर्वांची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
आर्टिकल 370 ची निर्मिती जिओ स्टुडिओ आणि उरी: द सर्जिकल स्ट्राइकच्या निर्मात्यांनी केली आहे. हा चित्रपट एक ॲक्शन पॉलिटिकल ड्रामा आहे, ज्यात अभिनेत्री यामी गौतम मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदित्य सुहास जांभळे यांनी केले आहे. ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.