‘वडिलांच्या रक्तातच काँग्रेस, मी आहे तिथंच’; अमित देशमुखांनी ठणकावूनच सांगितलं
Amit Deshmukh : वडिलांच्या रक्तातच काँग्रेस होती त्यामुळे मी आहे तिथंच ठीक असल्याचं आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधून अनेक आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. नूकताच अशोक चव्हाण यांनीही भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्यामागे काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पक्षांतरावर बोलताना अमित देशमुख यांनी आपली भूमिका सांगून टाकली आहे. दरम्यान, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अजितदादांनी फोडला सुनील तटकरेंच्या प्रचाराचा नारळ, रायगडची जागा राष्ट्रवादीचीच…
अमित देशमुख म्हणाले, मरावाड्यातला अग्रेसर असलेला विलास साखर कारखाना आहे. विलास साखर कारखान्यासह दोन कारखान्याला मराठवाड्यातला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. येणारा काळ सोपा नाही संघर्षाचा आहे. देशमुखांचं स्मरण केलं तर लक्षात येईल की निष्ठा काय असते, निष्ठेने समाजाची सेवा करणं निष्ठेने पक्षाचं काम करणं. मागील काळात अनेक प्रसंग आले तेव्हा देशमुखांच्या समोरही काँग्रेस पक्षातून काही कारवाई करण्यात आली होती.
देशमुखांना बेदखल करण्यात आलं त्यावेळी ते म्हणाले होते की, मला तुम्ही काँग्रेसमधून काढून टाकणार पण माझ्या रक्तातील काँग्रेस कशी काढणार हे त्यांचं वाक्य त्यावेळी वाक्य होतं, पण आज पक्षांतराच्या वावड्या उठल्याच्या चर्चा आहेत पण मी माध्यमांना सांगितलंय मी जिथं आहे तिथंच ठीक असल्याचं अमित देशमुखांनी स्पष्ट केलं आहे.
केवळ बाजारू विचारवंत, त्याची अनेक लफडी आम्हाला माहिती…; मिटकरींना थेट इशारा
तसेच देशात आणि राज्यात जी नवीन राजकीय परिस्थित समोर आलीयं. समाजाची जुडलेली नाळ तोडून इकडं तिकडं जाणं हे मला पटत नाही, मला खात्री आहे की राज्याच्या सर्वसामान्य माणसाला हे पटत नाही. यावर आपल्याला मात करायची आहे. सर्व सामान्यांचा विश्वास संपादन करुन पुन्हा राज्यात यशवंत चव्हाणांचे, वसंतदादा पाटलांचे, वसंतराव नाईकांचे, शरद पवारांचे, विलासराव देशमुखांचे तेच दिवस आणायचे असल्याचा निर्धारही अमित देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
youtube.com/watch?v=SZWfkFrAIUo
राज्यातील सामान्य माणसापर्यंत विचार पोहोचवणं आणि त्यामागे महाराष्ट्राला उभं करणं ही आता मान्यवरांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मलिक्कार्जून खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार, यांच्याकडे आस लावून महाराष्ट्रातला माणूस पाहतोयं त्याच्या आशा पूर्ण करायच्या असतील तर नाना पटोले, बाळासाहेब थोरात आपल्यावरच ही जबाबदारी महाराष्ट्र सोपवतोयं अन् आम्ही आपल्याबरोबर असल्याचंही अमित देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.