केवळ बाजारू विचारवंत, त्याची अनेक लफडी आम्हाला माहिती…; मिटकरींना थेट इशारा

  • Written By: Published:
केवळ बाजारू विचारवंत, त्याची अनेक लफडी आम्हाला माहिती…; मिटकरींना थेट इशारा

NCP Crises : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आव्हाड यांनी पुतण्या गद्दार म्हणून अजित पवारांवर टीकास्त्र डागलं होतं. त्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनीही (Amol Mitkari) आव्हाडांवर पलटवार केला होता. दरम्यान, या टीकेनंतर आता विकास लावंडे यांनी मिटकरींवर जोरदार टीका केली.

दंगल फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन, ‘या’ कारणामुळे 19 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

विकास लावंडे यांनी एक व्डिडिओ ट्वीटवर पोस्ट केला. त्यात ते म्हणतात, अजिदादा मित्रमंडळाचे लाभार्थी असलेले रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी हे सध्या काहीही बोलायला लागले. वैचारीक बैठक नसल्याने ते व्यक्तीगत हल्ले करत आहेत. आता त्यांच्याकडे आत्मविश्वास उरलेला नाही. आज अमोल मिटकरीसारखा आमदार जो फक्त मिमिक्री करतो. तो काही वर्षांपूर्वी 5-10 हजार रुपये घेऊन शिवचरित्र सांगायचा. जो स्वत:ला शिवव्याख्याता म्हणतो, पण, त्याला शिवछत्रपती नीट माहिती नाहीत. त्याला पुरोगामी विचार कळलेला नाही. कुठली तात्विक बैठक नाही. केवळ बाजारू विचारवंत म्हणून त्याची महाराष्ट्रात ओळख आहे अशा शब्दात लावंडे यांनी मिटकरींवर हल्लाबोल केला.

लावंडे पुढं म्हणाले की, ज्याला आपली ग्रामपंचायत निवडून आणता आली नाही, जिल्हा परिषदेला त्याचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. केवळ अजित दादांची दिशाभूल करून तो आमदार बनला. एक मिमिक्री करणारा आता आमदार बनला. त्याची अनेक लफडी आम्हाला माहिती आहेत. तो महिलांसोबत कसा वागतो, हेही आम्हाला माहिती आहे. त्यामुळं मिटकरींसारख्या बाजारू विचारवंताने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करू नये. मिमिक्री करून चमकोगिरी करू पाहणाऱ्या मिटकरींनी एकदा निवडून येऊन दाखवावं, असं आव्हानही लावंडे यांनी केलं.

Jiya Shankar : जिया शंकरच्या किलर स्माईलची चाहत्यांना भुरळ! 

मिटकरी काय म्हणाले?
जितेंद्र आव्हाड चळवळीच्या नावाखाली भामटेगिरी करणारी व्यक्ती आहे. हा भामटा माणूस आहे. माझे या माणसाला आव्हान आहे, हिंमत असेल तर अजितदादांनी महाराष्ट्रासाठी जे केले, त्यावर एकदा खुली चर्चा होऊ द्या. तुम्ही अजितदादांच्य उपकाराखाली जगलात. त्यांच्या टाचेखाली जगलात. तुमची जहागिरी संपली, त्यामुळं आता तुमची भामटेगिरी सुरू झाली. अजित पवार हे जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे बोलघेवडे नहाीत. आपल्या कामातून ते महाराष्ट्राला नवी दिशा देत आहेत. ते खरे बहुजन नेते आहेत. त्यामुळे चळवळीच्यचा नावाखाली वळवळ करणाऱ्या आव्हाडांनी आफलं थोबाड वेळीच आवरावं, अन्य़था त्यांना जशास तसं उत्तर देऊ, असं मिटकरी म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube