Download App

‘तेंडल्या’ चित्रपट दाखवून मराठी भाषा गौरव दिवस’साजरा, साताऱ्याच्या शाळेतील एक उपक्रम

Marathi film ‘Tendlya’ at School in Koregaon : सातारा जिल्ह्यातील एका शाळेत मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Din) एका आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आलाय. शाळेत विद्यार्थ्यांना एक मराठी चित्रपट दाखण्यात आल्याचं समोर (Marathi Movie) आलंय. या चित्रपटात अस्सल बोलीभाषा आपल्याला ऐकायला मिळतेय.

CM फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला ‘चहापान’चा कार्यक्रम, पाहा PHOTO

अंबवडे ता. कोरेगाव येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये ‘तेंडल्या’ हा मराठी चित्रपट दाखवून ‘मराठी भाषा गौरव दिवस’ साजरा करण्यात आला. या चित्रपटात दक्षिण सातारा भागातील अस्सल बोली भाषेतील संवाद आहेत.चित्रपटास एक राष्ट्रीय आणि पाच राज्य पुरस्कार मिळाले (entertainment news) आहेत. मे 2023मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट गाव – खेड्यात दाखवण्यासाठी ‘तेंडल्या आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे.

वितरण व्यवस्थेतील मक्तेदारी मुळे अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत. पुरेसे चित्रपटगृहे न मिळाल्याने ‘तेंडल्या आपल्या दारी’ हा उपक्रम दिग्दर्शक सचिन जाधव आणि सहकाऱ्यांनी सुरू केला आहे. पडद्यावर गाव, शाळा, महाविद्यालय, संस्था अशा ठिकाणी हा चित्रपट दाखवण्यात येत आहे. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून अंबवडे ता. कोरेगाव येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये ‘तेंडल्या’ हा चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी टीम तेंडल्याचे मंगेश बाबू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

VIDEO : ‘आमच्याकडे बहुमत, कामकाज रेटून नेणार…’ अजितदादांचं विरोधकांना प्रत्युत्तर

विद्यार्थ्यांनी मराठी विषयावर आधारित कविता सादर केल्या. या कार्यक्रमासाठी श्री मुधाई देवी विद्या मंदिर देउरचे प्राचार्य प्रदीप ढाणे, ज्ञानेश्वर गावडे, मुख्याध्यापक चेतन चव्हाण यांच्या सह गणेश ठाकरे, सहाय्यक दिग्दर्शक सर्वेश भाले, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस मदने यांनी केले तर विकास लादे यांनी आभार मानले.

 

follow us