VIDEO : मंचावरच रंगलं ‘महायुतीचं खुर्चीकारण’ … अजितदादा अन् एकनाथ शिंदेंमध्ये तुफान टोलेबाजी, CM फडणवीस म्हणाले…..

VIDEO : मंचावरच रंगलं ‘महायुतीचं खुर्चीकारण’ … अजितदादा अन् एकनाथ शिंदेंमध्ये तुफान टोलेबाजी, CM फडणवीस म्हणाले…..

Eknath Shinde And Ajit Pawar Conversation : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची (Mahayuti) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पुन्हा सगळ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील मिश्कीलपणा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खुर्चीकारण रंगलं आणि मंचावर एकच हशा पिकला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.

VIDEO : ‘आमच्याकडे बहुमत, कामकाज रेटून नेणार…’ अजितदादांचं विरोधकांना प्रत्युत्तर

राज्याचं विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नियमाप्रमाणे महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Politics) आणि अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीका केलीय. तर यावेळी महायुतीच्या मंचावर पुन्हा एकदा खुर्चीकारण रंगल्याचं पाहायला मिळालं.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारची नवी टर्म आहे. परंतु आमची टीम मात्री जुनीच आहे. केवळ आमच्या खुर्च्यांची अदलाबदली आता झालीये. फक्त अजितदादांची खुर्ची मात्र फिक्स आहे, असं ते अजित पवार यांना उद्देशुन म्हणाले.

VIDEO : आमचा अजेंडा खुर्ची मिळवणं….एकनाथ शिंदे ‘हे’ काय बोलून गेले?

यावर एकनाथ शिंदे यांना टोला लगावत अजित पवार म्हणाले की, तुम्हाला (एकनाथ शिंदे) खुर्ची फिक्स नाही ठेवता आली, त्याला मी काय करू? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमटची रोटेटिंग चेअर आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, हे सगळं समजुतीने चालू आहे. यानंतर मंचावर तिन्ही नेत्यांमध्ये मोठा हशा पिकल्याचं पाहायला मिळालंय.

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच विरोधकांवर निशाणा साधलाय. ते म्हणाले की, बहुमताच्या जोरावर कामकाज रेटायचं, अशी आमची भावना नाही. यासाठी चार आठवड्यांचं अधिवेशन ठेवलंय, असं ते म्हणाले आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे एकाच पक्षाची दोन चाकं असल्याचं देखील शिंदे म्हणालेय. आमचा अजेंडा खुर्ची मिळवणं नाहीये, आमचा अजेंडा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube