Download App

रणवीर अलाहाबादियानंतर, मराठी युट्यूब चॅनल ‘भाडिपा’ वर आक्षेपार्ह कंटेंट पसरवण्याचा आरोप ; शो रद्द

BhaDiPa YouTube Channel : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) समय रैनाच्या (Samay Raina) 'इंडियाज

  • Written By: Last Updated:

BhaDiPa YouTube Channel : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) समय रैनाच्या (Samay Raina) ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या एका कमेंटमुळे वादात सापडला आहे. रणवीर अलाहाबादिया यांच्यासह समय रैना आणि पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) देखील रणवीर अलाहाबादियाला समन्स पाठवले आहे. तर दुसरीकडे अनेक नेत्यांनी देखील इंडियाज गॉट लेटेंट शोवर आणि त्याच्या आयोजकांवर करवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तर आता एका मराठी यूट्यूबर चॅनलवर देखील आक्षेपार्ह कंटेंट पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

मराठी यूट्यूब चॅनेल भादिपा (भारतीय डिजिटल पार्टी) वर (BhaDiPa YouTube Channel) आता आक्षेपार्ह कंटेंट पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर या चॅनेलचे संस्थापक सारंग साठ्ये यांनी आगामी शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याबाबत इंस्टाग्रामवर एक अधिकृत निवेदन शेअर करत माहिती दिली आहे. या एपिसोडमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) एका खास सेगमेंटमध्ये दिसणार होती.

त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या सुरू असलेल्या वादामुळे, आम्ही 14 फेब्रुवारी रोजी होणारा अतिषय निर्लज्ज कांदे पोहे चा एपिसोड पुढे ढकलत आहोत. काहीही असो, व्हॅलेंटाईन डे ला प्रेमापेक्षा द्वेष जास्त मिळतो, परंतु तरीही आम्हाला आमच्या चाहत्यांवर प्रेम आहे. “आमच्या प्रतिभेला किंवा प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी तिकिटाची रक्कम लवकरच परत केली जाणार असल्याचे देखील आश्वासन दिले आहे. परताव्याची रक्कम 15 दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

स्वतःसाठी काहीतरी छान खरेदी करण्यासाठी याचा वापर करा! आम्हाला माहित आहे की आमचे चाहते आमच्यावर प्रेम करतात आणि आमच्या विनोदाच्या अनोख्या शैलीचा आनंद घेतात. म्हणूनच आम्ही आमचा कंटेंट पाहण्यासाठी विशेष YouTube सदस्यता सुरू केली आहे. असं त्यांनी म्हटले आहे.  तसेच आता आतिषय निर्लज्ज कांदे पोहेचे सर्व व्हिडिओ आता फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे रणवीर अलाहबादियाने इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये केलेल्या एका कमेंटमुळे वादात सापडला आहे. या शोमध्ये इलाहाबादियाने पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. वादानंतर यूट्यूबवरून हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि गुवाहाटी पोलिसांनी अलाहाबादिया आणि रैनासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ट्रम्प यांचा दणका.. कंगाल झाले शेअर बाजारातील महारथी, 40 दिवसात बुडाले हजारो करोडो रुपये

follow us