रणवीर अलाहाबादिया हजर हो! महिला आयोगाने बजावले समन्स, अडचणी वाढणार?

  • Written By: Published:
रणवीर अलाहाबादिया हजर हो! महिला आयोगाने बजावले समन्स, अडचणी वाढणार?

Ranveer Allahbadia NCW Summoned : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर इलाहाबादि (Ranveer Allahbadia) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. इंडियाज गॉट लेटेंट (India’s Got Latent) या शोमध्ये केलेल्या एका कमेंटमुळे दिवसांदिवस त्याच्या अडचणीच वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत या प्रकरणात आसाममध्ये रणवीर इलाहाबादिया याच्यासह समय रैना (Samay Raina) आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) देखील त्याला समन्स बजावले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने रणवीर इलाहाबादि याच्या कमेंटवर आक्षेप घेत म्हटले आहे की, हे प्रत्येक व्यक्तीच्या सन्मान आणि प्रतिष्ठेचे उल्लंघन करतात, विशेष:त अशा समाजात जो समानता आणि परस्पर आदर राखण्याचा दावा करतो. असं राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे. इलाहाबादिया आणि रैना व्यतिरिक्त अपूर्वा मखीजा (Apoorva Makhija) , शोचे निर्माते तुषार पुजारी (Tushar Pujari) आणि सौरभ बोथरा (Saurabh Bothra) यांना देखील राष्ट्रीय महिला आयोगाने समन्स पाठवले आहे.

नेमकं प्रकरण काय

इंडियाज गॉट लेटेंट या शोचा नवीन भाग नुकतंच रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये इलाहाबादियाने एक प्रश्न विचारला ज्यावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या शोमध्ये इलाहाबादियाने पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. ज्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. वादानंतर यूट्यूबवरून हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि गुवाहाटी पोलिसांनी अलाहाबादिया आणि रैनासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा ते संपते, जर कोणी मर्यादा ओलांडली तर कारवाई करण्यात येणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रणवीर इलाहाबादियाने माफी मागितली

रणवीर इलाहाबादियाचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच मोठा वाद निर्माण झाला त्यानंतर लगेच त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली. त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मी केलेली टिप्पणी योग्य नव्हती, कॉमेडी माझे वैशिष्ट्य नाही. मी फक्त येथे माफी मागण्यासाठी आलो आहे. असं त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

EVM मधून डेटा डिलीट करू नका, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

तसेच जे घडले त्यामागे मी कोणताही संदर्भ देणार नाही किंवा काही तर्क देणार नाही. मी फक्त माफी मागण्यासाठी इथे आलो आहे. असंही या व्हिडिओमध्ये रणवीर इलाहाबादियाने म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube