अश्लील विनोद…केंद्राने धाडली नोटीस, युट्यूबने रणवीर अलाबाडियाचा ‘तो’ व्हिडिओ हटवला

अश्लील विनोद…केंद्राने धाडली नोटीस, युट्यूबने रणवीर अलाबाडियाचा ‘तो’ व्हिडिओ हटवला

Ranveer Allahbadia Removed Video From youtube After Centres Notice : ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये युट्यूबर रणवीर इलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) केलेल्या अश्लील टिप्पणीवरून वाद सुरू आहे. यावर आता रणवीर इलाहाबादियाने माफी मागितली आहे, परंतु वाद काही संपत नाहीये. केंद्राने नोटीस पाठवल्यानंतर हा व्हिडिओ युट्युबवरून काढून टाकण्यात (Obscene Jokes) आलाय. केंद्राच्या सूचनेनंतर, YouTube ने कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोमधील एक वादग्रस्त भाग काढून टाकला आहे.

पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने अश्लील विनोद केले होते , ज्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली. त्याच्याविरुद्ध अश्लीलतेचा आरोप करत अनेक तक्रारी आल्या होत्या. आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी ट्विट केलंय की, भारत सरकारच्या आदेशानंतर रणवीर अलाहबादियाच्या अश्लील आणि विकृत टिप्पण्यांसह YouTube वरील ‘इंडियाज गॉट लेटेंट’ एपिसोड ब्लॉक करण्यात आला आहे. त्यांनी यूट्यूबवर या भागातील एक स्क्रीनग्रॅब देखील पोस्ट केला, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की, हा व्हिडिओ उपलब्ध नाही.

Tanaji Sawant : 68 लाखांचं बिल,पप्पा रागावतील म्हणून ऋषिराज… तानाजी सावंतांनी नेमकं काय सांगितलं?

आता या प्रकरणात, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने YouTube ला नोटीस पाठवली आहे. हा व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यास सांगितलंय. मानवाधिकार संघटनेने त्यांच्या पत्रात म्हटलं होतं की, त्यांना योगेंद्र सिंह ठाकूर यांची तक्रार मिळालीय. त्यांनी आरोप केलाय की, विनोदी कलाकार समय रैना यांनी आयोजित केलेल्या YouTube शोमध्ये भारतीय समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, अनुचित आणि अश्लील टिप्पण्या आहेत.

अश्लील विनोद केल्याबद्दल टीकेच्या फेरीत सापडलेले युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया यांनी माफी मागितलीय. सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र सिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (एनएचआरसी) तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत, NHRC ने YouTube ला एक पत्र लिहिलंय.

सावधान! ‘डीपसीक’मुळे पर्सनल डेटा धोक्यात; ‘या’ संस्थेने केली धक्कादायक माहिती उघड..

एनएचआरसीला सादर केलेल्या तक्रार पत्रानुसार, “समय रैनाचा शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ भारतीय समाजात नकारात्मकता, भेदभावपूर्ण मानसिकता, धार्मिक आणि सांस्कृतिक असहिष्णुता तसेच महिला आणि मुलांबद्दल असभ्य, असभ्य विचारसरणीला प्रोत्साहन देत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा शो अश्लीलता, अश्लील टिप्पण्या देऊन समाजात चुकीचा संदेश पसरवत आहे. त्यामुळे समाजात विकृत मानसिकता निर्माण होतेय.

पत्रात पुढे म्हटलंय की, हा शो केवळ भारतीय दंड संहिता (IPC), POCSO आणि इतर नियमांचे उल्लंघन करत नाही, तर तो भारतीय संविधानात नमूद केलेल्या नैतिकता, धार्मिक स्वातंत्र्य, महिला आणि मुलांचे संरक्षण या मूलभूत अधिकारांवरही हल्ला आहे. शो आणि त्याच्या परीक्षकांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील करण्यात आलीय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube