Tanaji Sawant : 68 लाखांचं बिल,पप्पा रागावतील म्हणून ऋषिराज… तानाजी सावंतांनी नेमकं काय सांगितलं?
Rishiraj Sawant Paid 68 Lakh Rupees For Bangkok Chartered Plane : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे त्यांचा मुलगा ऋषिकेश सावंत पुणे विमानतळावरून गायब झाल्याचे उघडकीस आल्यानंतर चर्चेत आलेत. यानंतर एकच खळबळ उडाली अन् बरंच नाट्य देखील घडलं. पोलिसांत अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. ऋषिकेश सावंत (Rishiraj Sawant) रात्री सुखरूप परतले असले तरी, जेव्हा खरी कहाणी बाहेर आली तेव्हा ऋषिकेश सावंत यांनी असं का केलं? असे प्रश्न निर्माण झालेत.
शिंदे गटाचे आमदार यांच्या मुलाच्या अपहरणाची बातमी समोर आली होती. या वृत्ताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान ही अफवा असल्याचं स्पष्ट झालंय. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत नेमका कुठे होता? हाच प्रश्न सर्वांना पडतोय. या घटनेची इनसाईड स्टोरी समोर (Tanaji Sawant Son) आलीय. या घटनेबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ या.
सावधान! ‘डीपसीक’मुळे पर्सनल डेटा धोक्यात; ‘या’ संस्थेने केली धक्कादायक माहिती उघड..
प्रत्यक्षात मात्र तानाजी सावंत यांच्या मुलाचं अहपरण झालं नव्हतं. तर तो मित्रांसोबत बॅंकॉकला गेल्याचं समोर आलं. त्यानंतर मात्र या अपहरण नाट्यावर पडदा पडला. ऋषिराज सावंत सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमध्ये बसून पुण्याच्या (Maharashtra Politics) लोहगाव विमानतळावर गेल्याचं निदर्शनास आलं होतं. तिथून ते मित्रांसोबत बॅंकॉकच्या दिशेने चार्टर्ड विमानात बसून रवाना झाले होते. या बॅंकॉक ट्रिपमध्ये ऋषिराज सावंत यांनी तब्बल 68 लाख रूपये खर्च केल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान या काळात ऋषिराज सावंतसोबत कोणताही संपर्क झाला नव्हता. त्यांचा फोनही लागत नव्हता, त्यामुळे अपहरणाच्या संशयाने मोठी खळबळ उडाली होती. या सगळ्याने पुण्यात मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यात आला अन् हे चार्टर्ड प्लेन चेन्नईला उतरवले गेले. विमानातून बाकीचे प्रवासी बाहेर पडले अन् रात्री नऊ वाजेच्या सुमारास लोहगाव विमानतळावर हे विमान दाखल झालं.
कथाकार, कादंबरीकार ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमदार तानाजी सावंत यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिलीय. ऋषिराज अन् माझ्यात कोणताही वाद झालेला नाही. आम्ही दोघांनी रात्री गप्पा मारल्या. ऋषिराजने प्रदोष असल्यामुळे पहाटे रुद्राभिषेक केला होता. त्यांनतर आम्ही आपापल्या कामाला लागलो होतो. आठ दिवसांपूर्वीच तो दुबईला गेलेला होता, मग अचानक बॅंकॉकला कसा गेला असा प्रश्न मला पडला. दिवसातून बऱ्याच वेळा आमचं फोनवर बोलणं होतं. मग तो अचानक विमानतळावर का गेला हे समजत नसल्याचं तानाजी सावंत यांनी स्पष्ट केलंय.
याच कारणामुळे आम्ही होतो. ऋषिराजसोबत त्याचे मित्र सुद्धा होते. पप्पा रागवतील म्हणून त्याने मला सांगितलं नाही का? हे आता ऋषिराजने सांगितल्यानंतरच समजेल, असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय. त्यामुळे आता या प्रकरणी आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.