Tanaji Sawant : आरोग्य मंत्र्यांचा मोठा दावा; सध्याची कोरोनाची लाट 15 मे पर्यंत ओसरणार
Corona wave will be over by next 15th : कोरोनाने (Corona) दोन वर्षांपूर्वी जगभरात कहर केला होता. यातच या व्हायरसने चीन पाठोपाठ भारतात धुमाकूळ घातला होता. कोरोना रुग्णसंख्या भारतात मोठ्या प्रमाणावर फैलावत होती. यातच देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले होते. दरम्यान, कोरोनाचा धोका तसा राहिलेला नाही. ही लाट डिक्लाइनिंग स्वरूपाला जात आहे. लाट ओसरत चालली आहे. येत्या 15 मे पर्यंत ही कोरोना लाट संपुष्टात येईल असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांनी केला आहे.
कोरोनाची आकडेवारी दररोजच्या दररोज कमी होत आहेत. बाराशे वरून हा आकडा साडेचारशेवर येऊन पोहोचला आहे. हा कोरोना व्हेरिएंट कमी तीव्रतेचा असल्याचेही सावंत यांनी सांगितले. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात सावंत यांनी ही माहिती दिली आहे.
ते म्हणाले की, गेल्या 2 वर्षापासून चालू असलेल्या कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. hp1v6 ही कोरोनाची लाट ओसरत असून टास्क फोर्सच्यचा माहितीनुसार, ही लाट 15 तारखेपर्यंत संपुष्टात येईल, त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही. लाट जरी संपुष्टात येत असली तर नागरिकांनी कोरोनापासून खरबदारी घ्यावी, असं आव्हान त्यांनी केलं.
khillar Movie: रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार चित्रपटात
नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळावी. जर लोकांना गर्दीच्या ठिकाणी जायचं असेल तर त्यांनी मास्क आवर्जून लावावा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियम पाळावे. हात वारंवार धुवावे, आजार अंगावर काढू नये. ताप, सर्दी झाल्सास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी सावंत यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहीती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात 28 एप्रिल 76 हजार 371 कोरोना रुग्णाचे निदान झाले होते. त्यापैकी 74216 रुग्ण बरे होऊन गेले. राज्यात मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत 15 टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या राज्यात 5 हजार 233 रुग्ण बाधित आहेत. मुंबई महापालिकेतर्फे जेष्ठ नागरिकांना विनामुल्य कोरोना लस देण्यात येत आहे.
राज्यामध्ये आजपासून ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही मुंबई महानगरपालिका आणि शिंदे सरकारची योजना सुरू होणार आहे. त्याचा फायदा सामान्य माणसाला होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिला.