Download App

”फक्त तूच मला वाचवू शकतेस”; ‘किशोरदांनी’ लतादिदींना लिहिलेलं पत्र व्हायरल, अनेक आठवणी उजळल्या

अहमदनगर : किशोर कुमार यांनी लतादिदींना Lata Mangeshkar : …म्हणून लता दीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, स्वत:च सांगितलेले कारण लिहिलेलं एक पत्र (Kishore Da’s Letter to Lata Didi) संगीत दिग्दर्शक मयुरेश पै (Mayuresh Pai ) यांनी सोशल मीडियावर शेअर केलंय. या पत्रामध्ये आठवणींनीचा अनमोल ठेवा जपला आहे, या पत्रामध्ये किशोर कुमार Kishor Kumar Birth Anniversary : ‘तुम ही मेरी जीवन नैया…’ जेव्हा किशोर कुमारांनी लता दीदींना लिहिले पत्रयांनी लतादिदींना नेमकं काय म्हटलंय? ते पाहू या.

बहीण लता,

चांगली तर आहेस! अचानक एका अडचणीत सापडलो आहे, फक्त तूच मला या समस्येतून सोडवू शकतेस. तसं घाबरण्यासारखं काही नाहीये, परंतु काळजी करण्यासारखे आहे. ऐक, आयुष्यात पहिल्यांदा सैनिक भावांची मदत करायला जातोय. तुला माहिती आहे की, मी अशा कोणत्याही समारंभात भाग घेत नाही. परंतु हा एक असा प्रसंग आहे, जो मी टाळू शकलो नाही.

Lata Dinanath Mangeshkar Award : विद्या बालन पुरस्कार स्वीकारताना का झाली भावूक?

होय, मी म्हणत होतो की आजच्या गाण्याची तारीख जर तु तुझ्या मर्जीनुसार दुसरी तारीख ठरवून दिलीस, तर तुझा हा उपकार मी कधीच विसरणार नाही. ही भावाची बहिणीला विनंती! मला आशा आहे की, तुला माझा मुद्दा समजला असेल. मला महाराज कल्याणजी-आनंदजींसोबत गाण्याची खूप आवड आहेय जर सोबतीला तु असशील तर ‘ सोने में सुहागा’ आहे, असं किशोर दा यांनी लतादिदींना (Lata Mangeshkar) लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

Lata Mangeshkar Death Anniversary : लतादीदींची गायकी ऐकून पंडित नेहरुंनाही फुटला होता अश्रूंचा बांध

हा प्रेमाचा धागा किती चांगला आहे. तो तुटू नये. मला इंग्रजीत लिहायचं होतं, पण एक भारतीय असल्याने मला फक्त हिंदीतच लिहिणं योग्य वाटलं. मला माहित आहे की तुला त्रास होईल. पण कसं तरी माझ्यासाठी ही गोष्ट सांभाळून घे. अजुन काय लिहु? बस्स… तु फक्त सगळं सांभाळून घेय रात्री फोन केला होता पण तू गाढ झोपेत होती. तुला उठवणं मला योग्य वाटलं नाही. ठीक आहे! परत आल्यावर पुन्हा भेटू. वडीलधाऱ्यांना माझं प्रेम. लहान मुलांसाठी प्रेम. मी दोन चित्रे काढली आहेत, मला आशा आहे की. तुला ते आवडतील.

तुझा भाऊ

किशोर दा गडबडी

अशा आशयाचं पत्र किशोर दा यांनी लतादिदींना लिहिलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी लतादिदींना त्यांच्यासोबत गाणं गाण्याची विनंती केलीय. लतादिदी आणि किशोर दा यांच्यातील प्रेमळ नातं जगजाहीर आहे. याच अनमोल खजिन्यातील हा एक खास आठवणींनीचा ठेवा आहे. मयुरेश पै यांनी हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलंय. या पत्रातून आपल्याला लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या नात्यातील गोडवा पाहायला मिळतोय.

follow us