Download App

Bigg Boss OTT 2’मध्ये होणार मिया खलिफाची एंट्री? भाईजानसोबत करणार धमाल

Bigg Boss OTT 2: सलमान खान (Salman Khan) म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका भाईजान मोस्ट अवेटेड शो बिग बॉसच्या दुसरा सीझनमध्ये मोठा धमाका करणार आहे. (Entertainment) जिओ सिनेमावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असणाऱ्या या शोची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. एकीकडे शोचा प्रोमो समोर आला आहे आणि दुसरीकडे बिग बॉसच्या घरात बंदिस्त होणार्‍या स्पर्धकांची नावे आहेत.


या यादीतील सर्वात आश्चर्यकारक म्हणजे अॅडल्ट फिल्म्सची क्वीन मिया खलिफा (Mia Khalifa), आता Bigg Boss OTT 2 मध्ये एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिया खलिफाला बिग बॉस ओटीटी 2 मध्ये येण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. ही पहिलीच वेळ नाही. याअगोदर देखील मियाला बिग बॉस 9 साठी देखील बोलावण्यात आले होते.

बिग बॉसमध्ये अॅडल्ट स्टार्स येणे ही काही नवीन गोष्ट नाही, हा गोष्ट खार तर सनी लिओनीपासून (Sunny Leone) सुरू झाली आहे. बिग बॉसनंतर सनीचे करिअर बॉलिवूडमध्ये रॉकेटच्या वेगाने उडू लागली आहे. कदाचित मिया खलिफा देखील असेच काहीतरी हवे असणार आहे. कारण तिने अॅडल्ट सिनेमा करणे बंद केले आहे आणि आता तिला पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे आहे.

https://letsupp.com/entertainment/a-man-tried-to-rape-actress-and-kathak-dancer-archana-joglekar-56018.html

मियाचे जगभरात असलेले चाहते या बातमीने खूप खूश आहेत आणि काही जण तिला बिग बॉस ओटीटीवर बघण्यासाठी खूप आतुरतेने वाट बघत आहेत. तर दुसरीकडे अशी देखील बातमी समोर आली आहे की, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला देखील बिग बॉसमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. अश्‍लील सिनेमा बनवून विक्री केल्याप्रकरणी राजचे नाव समोर आले आहे. ३ महिने तुरुंगात घालवून परत आलेला राज संपूर्ण चेहरा मास्कने झाकून मीडियासमोर येत आहे. परंतु भाईजानच्या Bigg Boss OTT 2 खूपच रंजक ठरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Tags

follow us