Download App

PVR Inox Shutdown: PVR Inox च्या 50 सिनेमा स्क्रीन होणार बंद, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

PVR Inox Shutdown: मल्टिप्लेक्स चेन ऑपरेटर पीव्हीआर आयनाॅक्स (PVR INOX) च्या जवळपास ५० सिनेमा स्क्रीन बंद होणार आहेत (PVR INOX to Shut Down 50 Screens). तोट्यामुळे स्क्रीन बंद करण्यात येणार असल्याचे कंपनीने यावेळी सांगितले आहे. खर्चामध्ये कपात करण्याच्या आणि खर्चाचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने कंपनी पुढील ६ महिन्यांत या स्क्रीन बंद करण्याच्या तयारीला लागली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअर्स घसरून व्यवहार करत असल्याचे यावेळी सांगितले आहे.

पीव्हीआर आयनाॅक्स देशात अग्रगण्य मल्टिप्लेक्स ऑपरेटर्सपैकी एक आहे. सोमवारी घोषणा करत असताना पीव्हीआरने सांगितले आहे की, नुकसान झाल्याने काही स्क्रीन बंद करण्यात येणार आहेत. कंपनीने १५ मे रोजी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये कंपनीला ३३३ कोटी रुपयांचा मोठा तोटा सहन करावा लागला आहे. पीव्हीआर आयनॉक्सने सांगितले आहे की, पुढील ६ महिन्यामध्ये जवळपास ५० सिनेमा स्क्रीन बंद करण्याची योजना आखली आहे. या मालमत्ता तोट्यामध्ये आहे किंवा कोणत्याही पुनर्विकासाची शक्यता कमी असलेल्या मॉलमध्ये आहेत. कंपनीने अशा मालमत्तेवर तोटा नोंदवला आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

पीव्हीआर आयनॉक्सने मार्चमध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीमध्ये ३३३ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे. कंपनीने याअगोदर डिसेंबर तिमाहीमध्ये १६.१ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. तर, वर्षभराअगोदर मार्च तिमाहीला कंपनीला १०५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. या तिमाहीमध्ये महसूल दुपटीने वाढून १ हजार १४३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी जानेवारी-मार्च तिमाहीत सुमारे ३०.५ दशलक्ष सिनेमा प्रेमींनी पीव्हीआर आयनॉक्स सिनेमांना भेट दिली.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

कंपनीने सांगितले आहे की, त्यांनी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये एकूण १६८ नवीन सिनेमा स्क्रीन उघडल्या आहेत. यामध्ये ज्यामध्ये PVR च्या ९७ स्क्रीन आणि INOX च्या ७१ स्क्रीन्सचा समावेश आहे. त्यावेळी जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये कंपनीने एकूण ७९ नवीन सिनेमा स्क्रीन उघडल्या जाणार आहेत. यामध्ये PVR च्या ५३ स्क्रीन आणि आयनॉक्सच्या २६ स्क्रीनचा समावेश करण्यात आला आहे.

Tags

follow us