Naal 2 : ‘नाळ’च्या यशानंतर आता ‘नाळ भाग 2 ‘ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुधाकर नेड्डी दिग्दर्शित ‘नाळ’ चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावरही आपली मोहोर उमटवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ‘नाळ २’ चित्रपट येत्या 10 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची यंदाची दिवाळी धमाकेदार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नागराज मंजुळे यांनी ही माहिती दिली आहे.
राहुल गांधींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’; पटोलेंचा भाजपला इशारा
झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे यांच्या ‘नाळ 2’ चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर झळकला असून ‘नाळ २’मध्ये कोण कोण कलाकार असणार?, नेमके यात काय पाहायला मिळणार? गाणी कशी असणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये आता कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. टीझरमधील दृश्य पाहुन ‘नाळ 2’ चित्रपटही कमालच असणार यात शंकाच नाही. येत्या दिवाळीत म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी हा ‘नाळ २’ प्रदर्शित होणार आहे.
Gadkari: नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर; ‘गडकरी’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित
माझ्या पहिल्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आई मुलाच्या नात्यातील खूप साधी अशी ही गोष्ट होती. आता हीच गोष्ट पुढे जाणार आहे. ‘नाळ 2’ ही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करेल, अशी आशा आहे. नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव खूपच अनोखा होता आणि आताही आहे. नागराज मंजुळे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता या सगळ्याच भूमिकेत अव्वल आहेत, झी स्टुडिओजने आजपर्यंत मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या दोघांबरोबर आता माझीही ‘नाळ’ जोडली गेली असल्याचं दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंटी यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपने सत्ता कशी मिळवली? शरद पवारांनी सांगून टाकलं
नाळ प्रदर्शित झाल्यानंतर सुधाकर रेड्डी यक्कंटी यांना राष्ट्रीय पुरस्कार, सुवर्ण पदक, पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले होते. या चित्रपटाने दिवाळीतही चित्रपटगृहात ‘हाउसफुल्ल’चे बोर्ड झळकवल्याचं पाहायला मिळालं होतं.
या चित्रपटाची भावनिक कथा, लहानग्याचे भावविश्व, ग्रामीण बाज, श्रवणीय गाणी, छायाचित्रण या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना भावल्या होत्या. ‘आई मला खेळायला जायचंय’ या गाण्याने तर प्रेक्षकांवर जादूच केली होती. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘चैत्या’च्या त्या निरागस भावविश्वात नेण्यासाठी सुधाकर रेड्डी यक्कंटी सज्ज झाले आहेत. ‘नाळ भाग २’च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला परत एक ‘सुपरहिट’ सिनेमा मिळणार, हे आता स्पष्ट झालं आहे.
राष्ट्रपती राजवट लावण्याची आयडिया शरद पवारांचीच होती; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
अमराठी दिग्दर्शकाने मराठी चित्रपट बनवावा आणि त्याच्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, हीच खरंच कौतुकाची बाब आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाने प्रेक्षकांचीही वाहवा मिळवली. या यशानंतर आता ‘नाळ भाग २ येतोय. यातही प्रेक्षकांना काहीतरी सर्वोत्कृष्ट पाहायला मिळणार असल्याची भावना झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नाळ 2 चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून चैत्या त्याच्या खऱ्या आईकडे निघाला आहे, आता त्याचा हा प्रवास त्याला कुठे नेणार? याचे उत्तर लवकरच चित्रपटगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.