Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आला आहे. या चर्चा त्याच्या खासगी आयुष्यामुळे रंगल्या होत्या. नवाजची पत्नी आलिया सिद्दीकीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. आता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. मात्र सैंधव सिनेमाच्या शूटिंगदरम्यान श्रीलंकेत नवाजुद्दीनचा अपघात झाला होता. या अपघातात तो थोडक्यात बचावला होता.
या सिनेमाच्या माध्यमातून दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत पदार्पण करत आहे. शैलेश कोलानुने या सिनेमाच्या दिग्दर्शन करत आहेत. 13 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. या सिनेमात नवाज खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमासाठी त्याने खास तेलुगू भाषा शिकल्याचे सांगितले आहे. या सिनेमासाठी तो खूप उत्सुक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दाक्षिणात्य ‘सैंधव’ सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यानचा एक किस्सा नवाजुद्दीन सिद्दीकीने “श्रीलंकेत ‘सैंधव’च्या शूटिंगदरम्यान मी थोडक्यात बचावलो आहे. या सिनेमाचं आम्ही अक्षरशः समुद्रात शूटिंग करत होतो. त्यावेळी एक मोठी लाट आली आणि मी जहाजात जोरदार आपटलो. आणि समुद्रात पडण्यापासून थोडक्यात बचावलो. महत्त्वाची बात म्हणजे हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. त्यामुळे सिनेमा बघत असताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येणार असल्याचे अभिनेत्याने यावेळी सांगितले आहे.
बॉक्स ऑफिसवर कतरिनाच्या मेरी ख्रिसमसने केली निराशा, बजेटच्या तुलनेत केली फक्त इतकीच कमाई
‘सैंधव’ या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीसह वेंकटेश, श्रद्धा श्रीनाथ, रुहानी शर्मा, जिशू सेन गुप्ता, मुकेश ऋषी आणि अंड्रिमा जेरेमिया महत्त्वाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला होता. निहारीका एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. संतोष नारायण यांनी या सिनेमाला संगीत दिल्याची माहिती समोर आली आहे. ‘सैंधव’सह नवाजुद्दीनचे ‘बोले चूडिया’, ‘नूरानी चेहरा’ आणि ‘संगीन’ हे सिनेमे लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.