Nawazuddin Siddiqui दिसणार आणखी एका बायोपिकमध्ये; आजपासून शूटिंगला सुरुवात

Nawazuddin Siddiqui दिसणार आणखी एका बायोपिकमध्ये; आजपासून शूटिंगला सुरुवात

Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच चित्रपट निर्माता विनोद भानुशाली (Vinod Bhanushali) आणि दिग्दर्शक सेजल शाह (Directed by Sejal Shah) यांच्यासोबत 90 च्या दशकातील एक रोमांचक थ्रिलर सेटमध्ये काम करताना दिसणार आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि बॉम्बे फेबल्स यांचा हा संयुक्त निर्मिती उपक्रम उत्कृष्ट प्रतिभा आणि कथाकथन एकत्र आणणारा एक महत्त्वाचा सिनेमा असणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला आज मुंबईत सुरुवात झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui)


बॉम्बे फेबल्सचे सेजल शाह आणि भावेश मंडलिया यांनी आम्हाला “सिरीयस मेन,” “डीकपल्ड,” आणि “असुर 2” सारखे पुरस्कार विजेते चित्रपट आणि मालिका दिल्या आहेत, आणि ते दिल्ली क्राईम 2 चे देखील निर्माते आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सेजल शाह यांचे कनेक्शन चाहत्यांना नक्कीच आवडणार आहे. सेजल दिग्दर्शक बनण्यासाठी तयार आहे आणि एक मनोरंजक कथेसह प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घालणार आहे.

भानुशाली स्टुडिओज लिमिटेडचे ​​निर्माते विनोद भानुशाली यांनी नाविन्यपूर्ण आणि आकर्षक कथा रुपेरी पडद्यावर आणण्याची त्यांची धडपड दाखवली आहे, ज्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे समीक्षकांनी मनोज बाजपेयी यांचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ तसेच पंकज त्रिपाठी यांचा ‘मैं अटल हूं’ हे सिनेमे सुपरहिट ठरले होते. या शीर्षकहीन प्रकल्पासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीसारख्या प्रतिभावान अभिनेत्यासोबत काम केल्याने त्यांना यश मिळाले आहे.

सिनेमाची पटकथा ही राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक भावेश मंडालिया याची आहे. चित्रपटात हटके कलाकार आहेत आणि प्रेक्षकांना एक मनोरंजक युग, अनोखी कथा आणि 90 च्या दशकातील अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी तयार आहे. जवळपास 40 दिवसांच्या शूटिंग शेड्यूलसह ​​या प्रकल्पाच्या शूटिंगला आज मुंबईत सुरुवात झाली आहे.

Singal Marathi Movie: ‘दोस्त दोस्त ना रहा’, अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा

या सिनेमाबद्दल नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितले आहे की, “विनोद भानुशाली निर्मित या चित्रपटाचा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. सेजल शाहचे एका उत्कृष्ट निर्मात्यापासून दिग्दर्शकात झालेले प्रेरणादायी प्रवास असणार आहे, मी ‘सिरीयस मेन’ नंतर त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्यास उत्सुक आहे. यासाठी मी आनंदी आहे. हा चित्रपट भावनांचा एक रोलरकोस्टर राईड असणार आहे, जो चित्रपटाशी संबंधित टीम आणि प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय प्रवास असणार आहे.

निर्माते विनोद भानुशाली यांनी या चित्रपटाबद्दल उत्साह व्यक्त केला आणि म्हणाले, “भानुशाली स्टुडिओ लिमिटेड प्रेक्षकांना आवडेल, अशी अशा व्यक्त करतो. सेजल शाह आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत आमच्या सहकार्याचा उद्देश एक जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव देण्याचा असणार आहे. विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, सेजल शाह आणि भावेश मंडलिया निर्मित या अनटायटल थ्रिलरची निर्मिती करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube