Download App

Nitin Desai Death : असेच म्हणाला होता तुम्ही…; देसाईंच्या एक्झिटमुळे बावनकुळे हळहळले

  • Written By: Last Updated:

Nitin Desai Death : आयुष्य मोरपंखी, रंग म्हणजे जगणं… रंगात न्हाऊन निघणं म्हणजे आयुष्याचा जलतरंग, तुम्ही तसेच जगलात अशा ओळी लिहित भाजप नेत्याने नितीन देसाई यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले आहे. देसाई यांच्या अकाली जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला असून, चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळातूनही शोक व्यक्त होत आहे.
देसाई यांच्या अचानक जाण्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांनी देसाई यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत देसाईंच्या निधनावर भावना व्यक्त केल्या आहेत.

बावनकुळेंचं ट्विट काय?
नितीन देसाईंच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंग्रशेखर बावनकुळेंनी ट्विट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते ट्विटमध्ये म्हणतात की,  प्रिय नितीन देसाई, आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंग येऊनही त्यावर लीलया मात करणारे तुम्ही, जे करु ते भव्य दिव्यच करु हा ध्यास बाळगणारे तुम्ही … चित्रपटसृष्टीत कर्तृत्वाने मैलाचा दगड ठरलेले तुम्ही, तुमच्या कलासक्तवृत्तीने जग अधिक सुंदर बनविणारे तुम्ही. आयुष्य मोरपंखी आहे. रंग म्हणजे जगणं… आणि रंगात न्हाऊन निघणं म्हणजे आयुष्याचा जलतरंग, असेच म्हणाला होतात तुम्ही. अशी अचानक एक्झिट घ्याल असे कधी वाटलेच नव्हते. खूप वेदना देऊन गेले. माझी विनम्र श्रद्धांजली! ॐ शांती असे म्हणत बावनकुळेंनी देसाईंना श्रद्धांजली वाहिली आहे.

Nitin Desai: अडीचशे कोटींच्या कर्जाचा डोंगर अन् स्टुडिओ जप्तीची भीती? नितीन देसाई होते आर्थिक विवंचनेत

झगमगाटात राहूनही त्यांचं वागणं साधं, विनम्र होतं – अजित पवार 

महाराष्ट्राच्या कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांशी निकटचे, मित्रत्वाचे संबंध असलेल्या नितीन देसाईंचं अशा पद्धतीनं अचानक निघून जाणं अनाकलनीय, अविश्वसनीय, मनाला चटका लावणारं आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांचं मनापासूनचं सहकार्य असायचं. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णममहोत्सवाच्या आयोजनात त्यांनी सर्वस्व झोकून काम केलं. प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथ तयार करण्यात त्यांची नेहमीच मदत व्हायची. हिन्दी चित्रपटसृष्टीसारख्या झगमगाटात राहूनही त्यांचं वागणं साधं, विनम्र होतं असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देसाईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Nitin Desai death : छाया चित्रकार ते एन डी स्टुडिओचे मालक, बहुआयामी व्यक्तिमत्व नितीन देसाई

अशी एक्झिट अपेक्षित नव्हती – एकनाथ शिंदे

‘कला क्षेत्रात नितीन यांनी स्वतःच्या हिंमतीवर ओळख निर्माण केली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्या नितीन यांची अशी एक्झिट अपेक्षित नव्हती. त्यांच्या जाण्याने देसाई कुटुंबीयांवर आघात झाला आहे. त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Tags

follow us