Download App

‘थ्री इडियट्स’मधील ‘चतुर’चं मराठीत पदार्पण; ‘आईच्या गावात मराठीत बोल’मध्ये साकारणार मुख्य भूमिका

Omi Vaidya In Marathi Movie: थ्री इडीयट्स (3 Idiots) या ब्लॉकबस्टर बॉलीवूड (Bollywood) सिनेमातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने (Omi Vaidya) चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर चाहत्यांना ओमी वैद्य केरळी, केन्यन, मल्याळी, आफ्रिकन आहे असे वाटे पण तो तर आपला मराठी मुलगा ! आणखीन आश्चर्याची बाब म्हणजे ओमीने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळातल्या गणेश उत्सवातल्या नाटकाने केली होती. मग पहिला सिनेमा दिग्दर्शित करायचा तर तो मायभाषेतच या ओमीच्या निर्णयाबद्दल कुणाला नवल वाटायचं कारण नाही. ‘तर मग आता ओमीची मुख्य भूमिका असलेला, टीएटीजी फिल्म्स एलएलपीची प्रस्तुती असलेला, ‘आईच्या गावात मराठीत बोल’ (Aaichya Gavat Marathit Bol) हा धम्माल विनोदी चित्रपट येत्या 19 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे .


सिनेमाचा नायक समर (ओमी वैद्य), अमेरिकेतून आपल्याला देशात आल्यावर अनपेक्षित वळणांचा एक अनोखा प्रवास चाहत्यांना अनुभवता येणार आहे. वाक्यागणिक मराठीचा अपभ्रंश करणारा , धेडगुजरी बोलणाऱ्या समरची कायापालट होऊ शकणार का? साता समुद्रापार वसलेली आपल्या महाराष्ट्राची मुलं बाळं एक आधुनिक “मराठीपण” जोपासू शकणार का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समरला गवसतातच , पण प्रेम, कुटुंब, स्वतःची पाळंमुळं याचा खरा अर्थही जसा समरला सापडतो, तसाच त्याचा हा प्रवास चाहत्यांनाही भावणार आहे.

या सिनेमाची निर्मिती अहमद लुकान, डॉ. पुनीत चांडक, डॉ. सुमुल रावल, मार्थेश्वरन सोलामुथू, माईक कासिन, राजन वासुदेवन, संजय सहगल, शाहीन गांधी, स्टीव्हन मोरलँड, सुप्रतीम डे, उदय कुमार यांनी केली आहे. अमेरिकेत जन्मलेला पण महाराष्ट्रबद्दल उर्मी असणारा ओमी वैद्य आणि अमेरिकेत राहत असून मराठीचा वसा जोपासणारी अमृता हर्डीकर यांनी अमेरिकेतच ह्या सिनेमाची कथा,पटकथा आणि संवाद लिहून चित्रपटाची आखणी सुरु केली.

Dunki Song Release: शाहरुख खानच्या ‘डंकी’ सिनेमातील ‘निकले थे कभी हम घर से’ गाणं रिलीज

सिनेमॅटोग्राफीची धुरा योगेश कोळी यांनी सांभाळली आहे. ते संगीत आणि पार्श्वसंगीत अविनाश विश्वजीत यांनी दिलेले आहे. तसेच या सिनेमाचे संकलन मयूर हरदास आणि ओमी वैद्य यांनी केले आहे .’आईच्या गावात मराठीत बोल’ या सिनेमात मुख्य भूमिकेत ओमी वैद्य , संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, विद्याधर जोशी, इला भाटे, किशोरी शहाणे, उदय टिकेकर, अभिषेक देशमुख, सुप्रिया विनोद, नेहा कुलकर्णी, ओंकार थत्ते, ध्रुव दातार,सायली राजाध्यक्ष सुधीर जोगळेकर असे कसलेले कलाकार आहेत. ओमी वैद्य पहिल्यांदाच मराठी सिनेमात काम करत असल्याने चाहत्यांना मोठी उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Tags

follow us