ऑस्करची ट्रॉफी विकता येते! खरेदीचा नियम कुणाच्या नावे, बदललेला नियम काय?

Oscar trophy या ट्रॉफीचा खरं नाव काय? तसेच ही ट्रॉफी विकली जाऊ शकते का? ते रेकॉर्ड कुणाच्या नावे आहे यावर काय नियम आले जाणून घ्या सविस्तर...

Oscar Trophy

Oscar Trophy

Oscar trophy can be sold Purchase rule in whose name, what is the changed rule : लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये 98 ऑस्कर पुरस्कारांची सुरुवात झाली आहे. विजेत्यांची नावं घोषित करण्यात आली आहेत. लियोनार्डो डिकॅप्रियो यांचा चित्रपट ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ ने सर्वात जास्त सहा पुरस्कार जिंकत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. मात्र ऑस्कर विजेत्यांच्या हातामध्ये दिसणाऱ्या या ट्रॉफीची देखील एक खास गोष्ट आहे. त्या ट्रॉफीला ऑस्कर ट्रॉफी म्हटलं जातं पण हे तिचं खरं नाव नाही. जाणून घेऊया ही खास गोष्ट काय आणि या ट्रॉफीचा खरं नाव काय? तसेच ही ट्रॉफी विकली जाऊ शकते का? ते रेकॉर्ड कुणाच्या नावे आहे आणि त्यानंतर यावर काय नियम आले जाणून घ्या सविस्तर…

एलपीजीचा काळाबाजार झाल्याच ! राज्यात बाराशे सिलिंडर जप्त; पुरवठामंत्री भुजबळांची थेट आकडेवारी

ही ट्रॉफी 13.5 इंच उंचीची आणि तीन पॉईंट आठ किलो वजनाची आहे. कांस्य पासून बनवलेल्या ट्रॉफीला सोन्याचा मुलामा दिलेला आहे.
ऑस्करच्या ऑफिशियल ट्रॉफीचं ऑफिशियल नाव हे अकॅडमी अवॉर्ड्स ऑफ मेरिट असं आहे. पण ही ट्रॉफी ऑस्कर नावाने आधिक लोकप्रिय आहे. ऑस्करची ट्रॉफी पहिल्यांदा पाहिल्यानंतर अॅकॅडमिक लायब्रेरियन मार्गरेट हेरीक म्हटल्या होत्या की, ही ट्रॉफी माझ्या काकाशी मिळती-जुळती आहे.

Video : दुर्गेश मंगेशकर यांचा पालकांना ‘गुरुमंत्र’: क्लास जॉईन करण्यापूर्वी छोटा प्रयोग नक्की करून पहा!

अॅकॅडमिने 1939 पर्यंत ट्रॉफीच्या ऑस्कर या नावाला अधिकृत स्विकारलेलं नव्हतं. मात्र 1934 पर्यंत तीच हे नाव प्रचलित झालं होतं. हॉलीवुडच्या कॉलमिस्ट सिडनी स्कोल्स्की यांनी कॅथरीन हेपबर्नमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला पुरस्कार जिंकल्यानंतर एका लेखामध्ये या पुरस्काराच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा या पुरस्काराला ऑस्कर पुरस्कार म्हटलं होतं. तर लायब्रेरीयन मार्गरेट या नंतर ऑस्करच्या कार्यकारी निर्देशक झाल्यानंतर त्यांनी या नावाची अधिकृत स्विकारलं. पण एक वेळ अशी आली होती. जेव्हा ही ट्रॉफी लिलावातून विकण्यात आली होती आणि मायकल जॅक्सन यांनी ती खरेदी देखील केली गेली होती.

ऑस्कर ट्रॉफी विकता येते का?

ऑस्कर ट्रॉफी बाबत काही कडक नियम आहेत. मोशन पिक्चर्स अँड सायन्सेस अकॅडमी यांचा नियम आहे की, जर एखादा विजेता त्याची ऑस्कर ट्रॉफी विकू इच्छित आहे. तर तो तिचा थेट लिलाव करू शकत नाही. त्यावर बंदी आहे. मात्र जर एखाद्या विजेत्याला ही ट्रॉफी विकायची असेल तर त्याला अकादमीला एक डॉलरमध्ये ती परत करता येते. हा नियम यासाठी बनवण्यात आला होता. जेणेकरून ही ट्रॉफी एक गौरवशाली गोष्ट ठरेल. केवळ फायद्यासाठी व्यापार करण्याची नाही. हा नियम 1951 मध्ये लागू करण्यात आला होता. मात्र त्या अगोदरच्या ट्रॉफीला हा नियम लागू नाही.

कुणी घेतली होती ही ट्रॉफी?

ऑस्कर ट्रॉफी न विकण्याचा नियम 1951 ला आला होता. त्या अगोदरच्या ट्रॉफीवर हा नियम लागू नाही. यामुळेच काही ट्रॉफीज या मोठ्या रकमेवर विकल्या गेल्या. उदाहरणार्थ मायकल जॅक्सन यांनी गॉन विथ द विंड या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार जवळपास 15 लाख डॉलर्समध्ये खरेदी केला होता. हा पुरस्कार चित्रपटाचे निर्माते डेव्हिड ओ. सेल्झनिक यांना मिळाला होता. हा त्याकाळी इतिहासातील सर्वात महागडा ऑस्कर होता. जो लिलावामध्ये विकला गेला.

LPG Crises : इंडक्शन शेगडीची ABCD; गॅस टंचाईत उपयोगी विज्ञान, फायदा अन् एक भारी जुगाड!

तर त्या अगोदर 1942 सिटीजन केन या चित्रपटाला मिळालेला पुरस्कार तब्बल 8 लाख 61 हजार 542 डॉलर्संना विकला गेला होता. तसेच 1940 आणि 50 च्या दशकातील काही विजेत्यांनी देखील त्यांच्या ट्रॉफीज विकलेल्या आहेत तर काही कलाकारांच्या कुटुंबियांनी अशाप्रकारे ट्रॉफी विकल्या होत्या. त्यामुळे हे थांबवण्यासाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे.

 

Exit mobile version