राणी अन् काजोलच्या आजोबांच्या स्टुडिओची विक्री; कामगारांच्या रोजी-रोटीवर गदा, फिल्म असोसिएशनचा आक्षेप

राणी अन् काजोलच्या आजोबांच्या स्टुडिओची विक्री; कामगारांच्या रोजी-रोटीवर गदा, फिल्म असोसिएशनचा आक्षेप

Mumbai’s iconic Filmistan Studio has been sold Film Association objects to mace on workers’ livelihood : अभिनेत्री राणी मुखर्जी आणि काजोल यांचे आजोबा शशधर मुखर्जी यांचा ऐतिहासिक फिल्मिस्तान या स्टुडिओची विक्री करण्यात आली आहे. मुंबईतील मोठ्या स्टुडिओंपैकी तो एक होता. त्याची सुरुवात अशोक कुमार आणि शशधर मुखर्जी यांनी 1940 मध्ये केली होती. हा स्टुडिओ रियल इस्टेट डेव्हलपर्स आर्केड डेव्हलपर्स यांनी 183 कोटींना खरेदी केला आहे. हा स्टुडिओ पाडून आता या ठिकाणी रेसिडेन्शियल बिल्डींग बांधण्यात येणार आहे.

चार वर्षांची चिमुकली तिसऱ्या मजल्यावर अडकली अन् घडलं असं काही…,व्हिडिओ व्हायरल

मुंबईतील गोरेगाव मध्ये असलेल्या या स्टुडिओची रजिस्ट्री 3 जुलैला झाली. व्हायरल भयानीने दिलेल्या माहितीनुसार या स्टुडिओच्या जागेवर मार्केट डेव्हलपर्सकडून तीन हजार कोटींचा लक्झरीअस बिल्डींग बांधण्यात येणार आहे. हा प्रोजेक्ट 2026 पासून सुरू होईल. यामध्ये 50 मजली इमारत बांधली जाईल. ज्यामध्ये तीन, चार आणि पाच बीएचके फ्लॅट आणि पेंन्ट हाऊस असतील.

…तर मी आत्मदहन करणार, महादेव मुंडे खून प्रकरणात पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे काय म्हणाल्या?

तर फिल्मी स्थानी असतो बद्दल सांगायचं झालं तर 40 च्या दशकात अशोक कुमार आणि शशधर मुखर्जी हे बॉम्बे टॉकीजचाच एक भाग होते. पण त्याचे मालक हिमांशू राय यांच्या निधनानंतर अशोक कुमार आणि शशधर मुखर्जी यांनी बॉम्बे टॉकीज सोडून फिल्मिस्तान स्टुडिओची सुरूवात केली. या स्टुडिओला हैदराबादचे निजाम ओसामा अली खान यांनी फंडिंग केलं होतं.

शिवाजीराव भोसले बँक घोटाळा प्रकरण : आमदार ज्ञानेश्वर कटकेंचे नाव वगळलं, हायकोर्टात जनहित याचिका दाखल

या स्टुडिओमध्ये 2014 ला रिलीज झालेल्या आलिया भट आणि अर्जुन कपूरच्या 2 स्टेट्स चित्रपटातील ओफ्फो गाण्याचे शुटींग झाले होते. तसेच 40 च्या दशकातील अनारकली, मुनीमजी, नागिन, तुमचा नही देखा, पेईंग गेस्ट यांसारखे अनेक चित्रपट शूट केले गेले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

विद्यापीठं अन् महाविद्यालयांमधील रिक्त पदांच्या भरतीला वेग येणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

दुसरीकडे या स्टुडिओच्या विक्रीवर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन आक्षेप घेत ही विक्री थांबवण्याची मागणी केली आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्यात आले आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, या स्टुडिओ संबंधित कामगारांची रोजी-रोटी यावर चालते. त्यामुळे ही विक्री होऊ नये.

बुधवारी भारत बंदची हाक! 25 कोटी कर्मचारी उतरणार रस्त्यावर; बँकिंगसह अन्य सेवा होणार ठप्प

तर गेल्या काही दिवसांत या फिल्म स्टुडिओसह मुंबईतील असेच तीन मोठे स्टुडिओ देखील विकले गेले आहेत. ज्यांमध्ये राज कपूर यांचा आरके स्टुडिओ जो चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक स्टुडिओ मानला जातो. ज्यामध्ये राज कपूर यांच्यासह अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग केलं होतं. तसेच कमला अमरोही यांच्या जोगेश्वरीतील कमालिस्तान हा स्टुडिओ देखील विकला गेला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube