Download App

Oscars 2024: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दिग्गज स्टार्ससोबत बसलेला ‘तो’ श्वान नेमका कोण?

Oscars 2024: 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscars 2024) लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. अत्यंत प्रतिष्ठित अशा या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वच कलाकार आणि चाहत्यांचं लक्ष लागून होतं. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) या सिनेमाला सर्वाधिक नामांकनं मिळाली होती. ‘बार्बी’, ‘पुअर थिंग्स’ आणि ‘ओपनहायमर’ या तीन सिनेमाचा मोठा बोलबाला या पुरस्कार सोहळ्यात बघायला मिळाला आहे. या पुरस्कार सोहळात (Messi) मेस्सीने म्हणजेच श्वानने (कुत्रा) ऑस्कर नामांकित चित्रपट’ ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’मध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. या चित्रपटातील चमकदार कामगिरीनंतर मेस्सी जगभर प्रसिद्ध झाला.

आता ऑस्करमध्ये एंट्री झाल्यानंतर पुन्हा एकदा मेस्सीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जगातील सर्व मोठे अभिनेते, अभिनेत्री आणि चित्रपट निर्माते यांच्यामध्ये ‘कुत्रा’ बसलेला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यापूर्वी मेस्सी या पुरस्कार सोहळ्याचा भाग नसल्याची चर्चा होती. पण लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित 96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात तो अचानक दाखल झाला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अवॉर्ड शोचे सूत्रसंचालन करणाऱ्या जिमी किमेलने टाळ्यांच्या कडकडाटात मेस्सीचे स्वागत केले.


यादरम्यान मेस्सीच्या उत्कृष्ट कामगिरीचीही जोरदार चर्चा झाली. तो म्हणाला, “जरी हा कुत्रा असला तरी त्याने ‘ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’मध्ये वर्षातील सर्वोत्तम कामगिरी दिली. ऑस्करमध्ये मेस्सीला अधिकृतरीत्या कोणत्याही श्रेणीत नामांकन मिळाले नव्हते, पण त्याच्या उपस्थितीमुळे वादही निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक चित्रपट कंपन्यांनी याला विरोध केला आणि मतदानादरम्यान ॲनाटॉमी ऑफ अ फॉलचा अन्यायकारक फायदा मिळू शकतो अशी चिंता व्यक्त केली.

चित्रपटात मेस्सीची भूमिका नेमकी काय आहे? ‘ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’ हा क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. जस्टिन ट्रीट दिग्दर्शित, या चित्रपटात मेस्सी एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे, जो 11 वर्षांच्या डॅनियलला (मिलो मचाडो ग्रेनर) भावनिक आधार देतो. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अनेक श्रेणींमध्ये ऑस्कर नामांकने मिळाली. सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा हा एकच पुरस्कार मिळाला असला तरी. चित्रपटाची कथा एका महिलेभोवती फिरते जिच्यावर पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. या हत्येचा मुख्य साक्षीदार महिलेचा मुलगा आणि मेस्सी म्हणजेच कुत्राही देखील त्या हत्येचा साक्षीदार आहे.

follow us