शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं की परत मिळण्याची गॅरंटी म्हणून…, फडणवीसांनी भर मंचावरून सांगून टाकलं

Devendra Fadanvis यांनी डॉ. प्रतापसिंह जाधवांंच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यामध्ये भर मंचावरून शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावरून मोठं विधान केलं.

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis on Ekanath Shinde for CM post in Dr. Pratapsinh Jadhav’s Sahastra Chandradarshan ceremony : आज बुधवार 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरमध्ये पुढारीचे संपादक आणि उद्योजग पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विविध राजकीय मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी बोलताना भर मंचावरून शिंदेंच्या मुख्यमंत्री पद देण्याच्या मुद्द्यावरून मोठं विधान केलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

या सोहळ्याला मी पूर्ण वेळ उपस्थित राहू शकणार नाही. कारण एलन मस्क यांची सॅटेलाईट कंपनी असलेल्या स्टार लिंकचे सीईओ करारासाठी आलेले आहेत. त्यांना जायचं असल्याने मी आणि आशिष शेलार जाणार आहोत. म्हणून मी शरद पवार यांची अगोदर बोलण्याची परवानगी घेतली. तसंही मी आणि एकनाथ शिंदे आदलाबदल करत असतो.

संध्या शांताराम यांच्या आठवणींना उजाळा; ‘झनक झनक पायल बाजे’ चे खास प्रदर्शन

कधी ते मुख्यमंत्री असतात कधी मी मुख्यमंत्री असतो. तर कधी ते उपख्यमंत्री असतात कधी मी उपमुख्यमंत्री असतो. त्यामुळे आज माझ्या म्हणजे मुख्यमंत्र्‍यांच्या जागेवर भाषण करणार आहेत. तसेच त्यांना मुख्यमंत्री पद दिलं तर ते सेफ असतं. कारण ते परत करतात आणि आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवतात. हे माहिती असल्याने मी काही रिस्क घ्यायला मागे-पुढे पाहिलेलं नाही. त्यामुळे आज ते माझ्यानंतर भाषण करतील.

महाराष्ट्र सरकारचा मोठा विक्रम! एलोन मस्कच्या स्टारलिंकशी करार करणारे ठरले देशातील पहिले राज्य

follow us