दिग्गजांच्या उपस्थित वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा कर्टन रेझर सोहळा संपन्न
Waterfront Indie Film Festival चा कर्टन रेझर कार्यक्रम नुकताच मोठ्या दिमाखात आणि दिग्गज कलाकारच्या सोबतीने उत्साहात पार पडला.

- वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान वर्सोवा येथील आराम नगर येथील रंगशिला थिएटरमध्ये होणार आहे, ज्यामध्ये इंडी चित्रपटांचा संग्रह, पॅनेल चर्चा आणि मास्टर क्लासेसचे प्रदर्शन केल जाणार असल्याचं कळतंय.
-
WIFF ला टुली रिसर्च सेंटर फॉर इंडिया स्टडीज (TRIS) आणि एज्युकेशन पार्टनर म्हणून अॅप्लॉज एंटरटेन्मेंट आणि इतर संस्थांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे.
- कथाकथनाला प्रेरणा देऊन येणाऱ्या पिढीने अनेक उत्तमोत्तम कलाकृती घडवल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं. आम्हाला आशा आहे की चित्रपटप्रेमी प्रेक्षक महोत्सवाचा तितकाच आनंद घेतील जितका आम्हाला तो एकत्र करण्यात आनंद झाला आहे.
- या फिल्म फेस्टीवलच्या संस्थापिका चित्रपट निर्मात्या विनता नंदा आणि चित्रपट समीक्षक दीपा गहलोत पुढे म्हणतात “WIFF हा केवळ फिल्म फेस्टीवल नाही तर तरुण चित्रपट प्रेमीनी पुढे येऊन आपल्याकडे बनवले जाणारे वेगवेगळे चित्रपट आणि त्यातील मांडलेल्या समस्या यावर चर्चा करावी. हा एक असा फिल्म फेस्टीवल आहे जिथे प्रत्येक चित्रपट प्रेमीने येऊन नक्कीच हा अनुभव घ्यायला हवा.
- पुढे ती म्हणाली, ‘इंडी सिनेमाला भेडसावणाऱ्या गोष्टी, बजेट, प्रवेश आणि वितरणाशी संबंधित आव्हानांवर चर्चा करण्यात आली. एक कलाकार म्हणून मला वाटत की कथाकथनात दृष्टीकोन बदलण्याची आणि समाजात बदल घडवून आणण्याची ताकद असते. स्वतंत्र चित्रपटासाठी काम करणाऱ्या या फिल्म फेस्टीवलचा आज या निमित्तानं भाग असल्याबद्दल मला खूप आनंद आहे.’
- अभिनेत्री रिचा चढ्ढा सांगते ‘वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा मी भाग झाले आणि मला याचा खूप आनंद होत आहे कारण हा महोत्सव भारतातील स्वतंत्र सिनेमाच्या गोष्टी साजऱ्या करणार आहे. इतक्या मान्यवर तज्ञांसोबत चर्चा करून या खास कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याचा सन्मान मला मिळाला म्हणून मी ऋणी आहे’.
- अभिनेत्री निर्माती रिचा चढ्ढा हिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मराठी इंडी फिल्म साबर बोंड चित्रपटाचं देखील यात कौतुक केलं. दमदार कथाकथन व्यावसायिक सूत्रांच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र चित्रपट किती मोठा परिणाम घडवू शकतो हे या चित्रपटांमध्ये बघायला मिळत अस देखील तिने सांगितलं. सोबतीला मराठी व मल्याळम इंडी सिनेमा हा नक्कीच यशस्वी चळवळी हे देशभरातील चित्रपट निर्मात्यांसाठी मार्गदर्शक ठरू ठरतील अस रिचा म्हणाली.
- दिग्गजांनी हा फक्त एक फिल्म फेस्टिवल नसून स्वतंत्र चित्रपटातील वैविध्यपूर्ण ट्रेंड, चित्रपट घडण्यामागची गंमत आणि इंडी सिनेमाचे विविध पैलू देखील यातून उलगडणार असल्याचं सांगितलं. तरुण चित्रपट प्रेमींनी यात सहभाग घेऊन अनेक गोष्टी शिकाव्या, बघाव्यात आणि हा फेस्टिवल अजून उत्तम करावा. अशी आशा या निमित्तानं व्यक्त करण्यात आली.
- वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टीवलचा कर्टन रेझर सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढा यांनी सूत्रसंचालन करून एक खास चर्चा देखील केली. या खास चर्चेत प्रसिद्ध चित्रपट उद्योग तज्ञ सुधीर मिश्रा, शुजित सरकार, रजत कपूर, दीपा गहलोत आणि श्रीधर रंगायन यांनी चित्रपट विश्वा बद्दल त्यांचे दृष्टिकोन मांडले.
- वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल हा इंडिपेंडंट सिनेमा बद्दलच्या अनेक विषयांवर चर्चा करणारा फिल्म फेस्टीवल ठरणार आहे. चित्रपट सृष्टीतील नवनवीन कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाची धुरा सांभाळली आहे.
-
वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा कर्टन रेझर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इथे हा सोहळा अगदी मोठ्या दिमाखात आणि दिग्गज कलाकारच्या सोबतीने उत्साहात पार पडला.