‘ठोकर लगती है तो दर्द होता है तभी मनुष्य सीख पाता है’, ‘पंचायत 3’चा फर्स्ट लूक रिलीज

Panchayat Season 3 First Look Release Out: पंचायत या वेब सीरिजच्या (Panchayat web series) प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. (Panchayat Season 3) पंचायतीच्या दोन्ही सीझनमध्ये जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) यांनी सेक्रेटरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. शोमधील सर्वच भूमिकेला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. या लोकप्रिय शोच्या तिसऱ्या सीझनची चाहते […]

Panchayat Season 3: 'ठोकर लगती है तो दर्द होता है तभी मनुष्य सीख पाता है', 'पंचायत 3'चा फर्स्ट लूक रिलीज

Panchayat Season 3: 'ठोकर लगती है तो दर्द होता है तभी मनुष्य सीख पाता है', 'पंचायत 3'चा फर्स्ट लूक रिलीज

Panchayat Season 3 First Look Release Out: पंचायत या वेब सीरिजच्या (Panchayat web series) प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. (Panchayat Season 3) पंचायतीच्या दोन्ही सीझनमध्ये जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) यांनी सेक्रेटरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. शोमधील सर्वच भूमिकेला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे. या लोकप्रिय शोच्या तिसऱ्या सीझनची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांची उत्कंठा वाढवत निर्मात्यांनी अखेर या मालिकेच्या तिसऱ्या सीझनचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे, ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.


पंचायत सीझन 3 चा फर्स्ट लुक रिलीज

प्राइम व्हिडिओने मोस्ट अवेटेड शोच्या तिसऱ्या सीझनचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. पहिल्या चित्रात, शोमध्ये सचिवाची भूमिका साकारणारा अभिनेता जितेंद्र कुमार त्याच्या आयकॉनिक बाईकवर स्वार होताना दिसत आहे. पाठीवर बॅग घेऊन आणि गडद चष्मा घातलेला तो पूर्ण स्वॅगमध्ये दिसत आहे.


दुसऱ्या फोटोमध्ये, अशोक पाठक (बिनोद) आणि त्याचे सीझन 2 सह-कलाकार दुर्गेश कुमार आणि बुल्लू कुमार यांची झलक बघायला मिळत आहे. तिघेही एका बाकावर बसलेले दिसतात. पंचायत सीझन 3 चा फर्स्ट लुक रिलीज करताना प्राइम व्हिडिओने इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्हाला माहित आहे की तुमची उत्सुकता वाढली आहे, म्हणून आम्ही सेटवरून तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहे! प्राइम सीझन 3 वर पंचायत.”

पंचायतच्या सीझन 3 चे शूटिंग पूर्ण

‘पंचायत’मध्ये मंजू देवीची भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ताने तिसऱ्या सीझनचे शूटिंग पूर्ण केले आहे. तिने सेटवरून एक रॅप-अप व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये शोच्या कलाकार आणि क्रूसह केक कटिंग सेलिब्रशन पार पडलं आहे. रघुबीर यादव (ब्रिजभूषण दुबे), चंदन रॉय (विकास), सान्विका (रिंकी), फैसल मलिक (प्रल्हाद पांडे) हे देखील व्हिडिओमध्ये दिसत होते. ते शेअर करताना नीना गुप्ता यांनी लिहिले, “पंचायतीच्या तिसऱ्या सीझनचा शेवट!”

अदिती राव हैदरी हिने ज्युबिली अन् ताजसाठी जिंकला लोकप्रिय अभिनेत्री-वेब मालिका सन्मान

पंचायतीचे दोन्ही हंगाम प्रचंड हिट ठरले

पंचायतीचे दोन्ही सीझन खूप हिट झाले होते. पहिला सीझन 2020 मध्ये आला होता. यानंतर त्याचा दुसरा सीझन 2022 मध्ये रिलीज झाला, जो चाहत्यांना खूप आवडला होता. सध्या चाहत्यांना पंचायत मालिकेच्या तिसर्‍या सीझनचीही प्रचंड उत्सुकता लागली आहे. पंचायत सीझन 3 पुढील वर्षी Amazon प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे.

Exit mobile version