Hustle Season 3: अमरावतीच्या पोराच्या मराठी रॅपनं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
Hustle Season 3: टीव्हीवरचा लोकप्रिय शो Hustle चा सिझन 3 (Hustle Season 3) जोरदार सुरु आहे. (Marathi Rap) देशाच्या विविध भागातील रॅपर्सना त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी हा शो एक हक्काचं व्यासपीठ बनला आहे. यामध्ये रॅपर बादशाह (Baadshah), स्क्वॉड बॉस इक्का, डी एमसी, डिनो जेम्स आणि ईपीआर हे रॅप शोचं परिक्षण करत असल्याचे बघायला मिळत आहे.
View this post on Instagram
एमटीव्ही हसल 3.0 च्या नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये अमरावतीच्या पोरानं धमाकेदार एन्ट्री घेत त्याच्या रॅपने परिक्षकांची देखील बोलती बंद केल्याचे दिसत आहे. अमरावतीचा रॅपर सौरभ अभ्यंकर (Saurabh Abhyankar) उर्फ 100RBH याने या शोमध्ये धमाकेदार एन्ट्री घेत असताना मराठी रॅप गायलं आहे. गाण्याचे अप्रतिम बोल आणि त्याचा दमदार आवाजच्या परफॉर्मन्स बघून परीक्षक देखील प्रभावित झाल्याचे बघायला मिळाले आहे.
अमरावतीचा मुलगा म्हटल्यावर बादशाहची उत्सुकता वाढली होती. स्टेजवर येताच जास्त न बोलता बादशाहने सौरभला लगेच रॅप सुरु करायला सांगितलं आणि सौरभने त्याच्या परफॉर्मन्सने संपूर्ण स्टेजवर धुराळा केला आहे. ‘आला अमरावतीचा पोरगा, खरं खरं गाण्यात सांगतो, जे बघितलं आहे, जे अनुभवलं आहे, सारं या गाण्यात मांडतो; शिवरायांचा मावळा हाय मी भेत नाही पण भेवाडतो’ असे त्या मराठी रॅपचे बोल अंगावर शहारे आणणारे आहेत.
Imraan Khan: ‘या’ दाक्षिणात्य विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात पडला अभिनेता
सौरभचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात त्याचा हा मराठी रॅप पोहोचला आहे. युट्यूबवर देखील त्याचा व्हिडिओ सध्या जोरदार ट्रेंड होत असल्याचे बघायला मिळत आहे. सौरभ सोशल मीडियावर अगोदरपासूनच लोकप्रिय आहे. आता कार्यक्रमात तो आणखी कोणकोणते रॅप सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. सध्या या रॅपनं सोशल मीडिया जोरदार धुमाकूळ घातला आहे.