Imraan Khan: ‘या’ दाक्षिणात्य विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात पडला अभिनेता
Imran Khan Viral Video: आमिर खानचा (Aamir Khan) भाचा बॉलिवूड अभिनेता इम्रान खान (Imran Khan) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरून गायब झाला आहे. अलीकडे इम्रान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आला होता. त्याची पत्नी अवंतिकासोबतचा (Avantika Malik) त्याचा घटस्फोट जोरदार चर्चेत आला होता.
View this post on Instagram
मात्र घटस्फोटानंतर आता इम्रानच्या (Imran Khan) आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. काल कीर्ती खरबंदा यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत इम्रान खान पुन्हा एकदा बघायला मिळाला आहे. यावेळी तो एकटा नसून एका खास व्यक्तीसोबत स्पॉट झाला होता. इम्रान खानसोबत चर्चेत असलेली गर्लफ्रेंड साऊथ अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनसोबत (Lekha Washington) तो पुन्हा एकदा स्पॉट झाला.
दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. या दोघांनी ‘मटरू की बिजली का मन डोला’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. काल दोघांना एकत्र पाहिल्यानंतर आता त्यांच्या डेटची चर्चा खरी मानले जात आहे.
लेखा वॉशिंग्टनचे लग्न झाले आहे. तर इम्रानने 2011 मध्ये अवंतिकाशी लग्न झाले आहे आणि 2019 मध्ये त्या दोघांमध्ये घटस्फोट झाले आहे. या दोघांनाही एक मुलगी आहे, तिचे नाव इमारा आहे. इमारा तिची आई अवंतिकासोबत राहते.
Salman Khan: सलमान खानने भाची अलिझेहच्या ‘फॅरी’ सिनेमाचा शेअर केला फर्स्ट लूक
इम्रान खानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, ‘जाने तू या जाने’ या पहिल्या चित्रपटातून त्याने प्रेक्षकांमध्ये एक अनोखं स्थान निर्माण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. पण या चित्रपटानंतर इम्रान खानने अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत, त्यानंतर तो मोठ्या पडद्यावरून गायब झाला.