Main Atal Hoo Box Office Collection Day 1: महेश बाबूचा ‘गुंटूर करम’ आणि तेजा सज्जाचा ‘हनुमान’ या दक्षिण चित्रपटांच्या गर्दीत पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) स्टारर चित्रपट या शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या सिनेमांनी गेल्या एका आठवड्यापासून बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घातला आहे. ‘मैं अटल हूं’ हा (Main Atal Hoo Movie) बहुप्रतिक्षित चित्रपटही प्रदर्शित झाला. हा चित्रपट देशाचे तीनवेळा पंतप्रधान राहिलेले अटल बिहारी वाजपेयी यांचा बायोपिक आहे. ज्यात पंकज त्रिपाठी यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशीची स्थिती कशी होती आणि किती कमाई झाली हे जाणून घेणार आहोत?
रिलीजच्या पहिल्या दिवशी ‘मैं अटल हूं’ने किती कमाई केली? ‘मैं अटल हूं’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. हा चित्रपट माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जीवन कहाणी दाखवतो. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘मैं अटल हूं’ला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे चित्रपटाची सुरुवात खूपच संथ गतीने सुरु झाली आहे. दरम्यान, ‘मैं अटल हूं’च्या रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.
SACNILC च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘मैं अटल हूं’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त 1 कोटी रुपये कमावले आहेत, जरी हे प्रारंभिक आकडे असले तरी अधिकृत आकडे आल्यानंतर त्यात थोडे बदल होऊ शकणार आहेत. पंकज त्रिपाठीचे ‘ओह माय गॉड 2’ आणि ‘फुक्रे 3’ हे दोन चित्रपट 2023 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच यशस्वी ठरले. ‘मैं अटल हूं’च्या तुलनेत ‘ओह माय गॉड 2’ आणि ‘फुक्रे 3’ने दमदार ओपनिंग केली होती. या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर ‘ओह माय गॉड 2’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 10.26 कोटींची कमाई केली होती. ‘फुक्रे 3’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 8.82 कोटींचा व्यवसाय केला. ‘मैं अटल हूं’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 1 कोटी रुपये आहे.
ठरलं तर! या दिवशी येणार खिलाडी अन् टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा टिझर, सर्वांना उत्सुकता
वीकेंडला ‘मैं अटल हूं’ला गती मिळेल का? ‘मैं अटल हूं’ची सुरुवात खूपच निराशाजनक झाली आहे. आता वीकेंडपासून निर्मात्यांना आशा आहे, शनिवार आणि रविवारी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करतो की नाही हे पाहणे बाकी असणार आहे. मात्र, चित्रपटातील पंकज त्रिपाठीच्या अभिनयाचे सर्वजणच तोंडभरून कौतुक करत आहेत.