Pooja Batra: ‘हिने खरंच काही घातलं नाही का’? स्विमिंग पूलमधील पूजा बत्राचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

Pooja Batra: पूजा बत्रा (Pooja Batra) हे भारतीय सिनेमासृष्टीतील एक मोठे नाव आहे. एकेकाळी ती दिग्दर्शकांची पहिली पसंती होती. पूजा बत्रा तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते आणि ती 1993 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत रनर अप होती. तसेच 80-90 च्या दशकात इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री पूजा बत्रा सध्या सिनेमापासून दूर आहे. (Video Viral) मात्र सोशल मीडियावर (Social […]

Letsupp Image (53)

Pooja Batra

Pooja Batra: पूजा बत्रा (Pooja Batra) हे भारतीय सिनेमासृष्टीतील एक मोठे नाव आहे. एकेकाळी ती दिग्दर्शकांची पहिली पसंती होती. पूजा बत्रा तिच्या सौंदर्यासाठी देखील ओळखली जाते आणि ती 1993 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत रनर अप होती. तसेच 80-90 च्या दशकात इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री पूजा बत्रा सध्या सिनेमापासून दूर आहे. (Video Viral) मात्र सोशल मीडियावर (Social media) तिचा मोठा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.


इन्स्टाग्रामवर (Instagram) ती बऱ्यापैकी सक्रीय असते. तसेच चाहत्यांसोबत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. पूजाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमधील तिच्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांचे तिने चांगलेच लक्ष वेधलं आहे. अक्षय कुमार, गोविंदा, संजय दत्त यांसारख्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केलेली पूजा वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर देखील तितकीच सुंदर आणि फिट असल्याचे बघायला मिळत आहे.

इन्स्टाग्रामवरील या व्हिडीओमध्ये पूजाने ट्रान्सपरंट ड्रेस घातला आहे, त्यावरून चाहत्यांनी तिला विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्विमिंग पूलमध्ये फोटोशूट करत असतानाचा तिचा हा व्हिडीओ आहे. मात्र या व्हिडीओमधील तिच्या हटके ड्रेसने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधलं आहे. ‘एका क्षणासाठी वाटलं की ती न्यूड आहे, पण तिने ट्रान्सपरंट ड्रेस घातला आहे’, असं एकाने लिहिले आहे. तर ‘तिच्या ड्रेसचा काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे,’ असं दुसऱ्या युजरने देखील ट्रोल करण्यास सुरुवात केले आहेत.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

काहींनी पूजाच्या या ड्रेसची तुलना उर्फी जावेदशी देखील केली आहे. तर काहींनी या फोटोशूटसाठी पूजाच्या हिंमतीची दाद दिली आहे. तसेच पूजा आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी एक काळ असा होता, जेव्हा तिची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात होती. पूजा बत्राने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तिने जाहिरातींमध्येही दीर्घकाळ काम केलं होतं. ‘हेड अँड शोल्डर्स’ या अमेरिकन शॅम्पूच्या जाहिरातीसाठी ती पहिली भारतीय चेहरा ठरली होती. प्रदीर्घ काळ जाहिरातींमध्ये काम केल्यावर तिने सिनेमांकडे वळण्याचा निर्णय घेतला होता.

Exit mobile version