मोठी बातमी: ‘लॉकअप’ फेम अभिनेत्री पूनम पांडेचं कॅन्सरने निधन, बॉलिवूड इंडस्ट्रीत पसरली शोककळा

Poonam Pandey Passed Away : अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) कॅन्सरने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. ( Poonam Pandey Death) मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे निधन झाले आहे. वयाच्या 32व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे पूनमच्या आकस्मिक निधानाने चाहत्यांना मोठा धक्का […]

Poonam Pandey Death: 'लॉकअप' फेम अभिनेत्री पूनम पांडेच निधन, बॉलिवूड इंडस्ट्रीत पसरली शोककळा

Poonam Pandey Death: 'लॉकअप' फेम अभिनेत्री पूनम पांडेच निधन, बॉलिवूड इंडस्ट्रीत पसरली शोककळा

Poonam Pandey Passed Away : अभिनेत्री पूनम पांडेचं (Poonam Pandey) कॅन्सरने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. ( Poonam Pandey Death) मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचे निधन झाले आहे. वयाच्या 32व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. यामुळे पूनमच्या आकस्मिक निधानाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

मृत्यूची बातमी इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली: अभिनेत्रींच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “आज सकाळ आमच्यासाठी कठीण दिवस आहे. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आपण आपली लाडकी पूनम गमावली आहे. तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक सजीवाला शुद्ध प्रेम आणि दयाळूपणा मिळाला. या दुःखाच्या वेळी, आम्ही गोपनीयतेची विनंती करू. आम्ही शेअर केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही त्याची आठवण ठेवू, अशी पोस्ट तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे.


निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का: पूनम पांडेच्या मृत्यूच्या वृत्ताला तिच्या पीआर टीमने या बातमीला दुजोरा दिला आहे. ही इन्स्टा पोस्ट चार दिवसांची असली तरी. अनेक वापरकर्ते याला प्रँक म्हणत आहेत आणि अभिनेत्रीच्या मृत्यूवर विश्वास ठेवू शकत नाहीत. या पोस्टनंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

Dhanush: सुपरस्टार धनुषच्या ‘या’ सिनेमाच्या चित्रीकरणाला ब्रेक; पोलिसांनी थांबवलं शूट

कोण होती पूनम पांडे? पूनम पांडे ही खूप प्रसिद्ध मॉडेल होती. 2011 क्रिकेट विश्वचषक फायनलपूर्वी तिने एका व्हिडिओ संदेशात वचन दिले की, भारताने अंतिम सामना जिंकल्यास मी काही खास फोटो शेअर करेल असे वक्तव्य केल्याने तिची लोकप्रियता गगनाला भिडली. या दाव्यामुळे ती पहिल्यांदाच वादात आली. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, पूनम पांडे शेवटची कंगना राणौतच्या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती.

पूनमचे ​​सॅम बॉम्बेसोबतचे लग्न वादग्रस्त ठरले. पूनमने सॅम बॉम्बेसोबत लग्न करूनही बरीच चर्चा झाली. हे लग्न सगळ्यांसाठीच सरप्राईज होतं. मात्र त्यांचे हे लग्न फार टिकले नाही. 2020 मध्ये लग्नानंतर तिने पती सॅम बॉम्बेवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करण्यात आला केला.

Exit mobile version