Download App

धक्कादायक! मृत्यूच्या बातम्यांदरम्यान Poonam Pandey स्वतः कॅमेऱ्यासमोर; मी जिवंत, हे सर्व केलं कारण…

Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) च्या निधनाच्या बातम्या माध्यमांवर फिरत असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे निधनाच्या बातम्या दरम्यान आता स्वतः पूनम पांडे (Poonam Pandey alive) ) कॅमेऱ्याच्या समोर आली आहे. तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत तीनही माहिती दिली. ती म्हणाली, मी जिवंत आहे. सर्व्हायकल कॅन्सरने माझा मृत्यू झालेला नाही.

शाहरुख खानसोबत संदीप वंगा रेड्डी बनवणार चित्रपट? दिग्दर्शकाने दिली मोठी हिंट

या व्हिडीओमध्ये पूनमने आपण हे सर्व का करत आहोत. यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली की, मी जिवंत आहे. सर्व्हायकल कॅन्सरने माझा मृत्यू झालेला नाही. मात्र या आजाराबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी हे सर्व केलं. याबद्दल अधिक माहितीसाठी तिने एक लिंक तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमध्ये दिली आहे. तसेच सर्व्हायकल कॅन्सरबाबात जनजागृती निर्माण करण्यासाठी तिने www.poonampandeyisalive.com ही बेबसाईट देखील सुरू केली असल्याची माहिती दिली.

दरम्यान आताच सादर झालेल्या बजेटमध्ये, सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबतीत अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी ज्या गोष्टी नमूद केल्या होत्या. त्याला प्रमोट करण्याबद्दल पूनम पांडे हिच्या टीमने ही PR Activity केली होती. त्यासाठी त्यांनी हे सर्व काही घडवून आणले असल्याचे आता समोर आले आहे.

Pune News : पुणे विद्यापीठात नाटकादरम्यान राडा; ललित केंद्र प्रमुखांसह 6 जण अटकेत

या व्हिडिओला कॅप्शन देताना पूनमने लिहिले आहे की, तुमच्या सर्वांसोबत काहीतरी महत्त्वाचं शेअर करायचं आहे. मी इथे आहे. जिवंत आहे. सर्व्हायकल कॅन्सरमुळे माझा मृत्यू झाला नाही. मात्र या गंभीर आजारामुळे अनेक महिलांचा मृत्यू होतो. कारण त्यांना या आजाराचा सामना कसा करायचा? याबाबत माहिती नसते. तसेच इतर कॅन्सरच्या प्रकारापेक्षा हा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी एचपीव्ही लस आणि तात्काळ तपासण्या होणे गरजेचे असतं. त्यामुळे या आजाराबद्दल जनजागृती निर्माण करूया. याबद्दल माहिती देऊया आणि या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी आणि त्याचा अंत करण्यासाठी प्रयत्न करूया. असं आवाहन यावेळी पूनमने केलं.

तसेच आपण सर्व्हायकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी केलेल्या निधनाच्या बातम्यांबाबत तिने चाहत्यांची माफी देखील मागणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ती म्हणाली की, मी तुमच्या सर्वांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागते. मात्र माझा हेतू सर्वांनी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरबाबत जनजागृती करावी आणि माहिती करून घ्यावी असाच होता. असं पूनम म्हणाली.

follow us