Download App

अमायरा म्हणजे महाराष्ट्राने खूप काय दिलं त्याची परतफेड; सुभाष घईंनी व्यक्त केली कृतज्ञता

Subhash Ghai ,लोकेश गुप्ते दिग्दर्शित, ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंटचा मराठी चित्रपट "अमायरा" आपल्या भेटीला येणार आहे.

Poster of Subhash Ghai’s new Marathi film Amaira released : जेव्हा एखादा चित्रपट चांगला आशय देतो तेव्हा तो प्रेक्षकांना आकर्षित करतो. मराठी सिनेमे सध्या संपूर्ण देशभरात आणि जगभरात प्रचंड यश मिळवत आहे. असाच एका हृदयस्पर्शी नवीन विषयासह सुभाष घई यांच्या मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित, ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंट च्या अंतर्गत नवा मराठी चित्रपट “अमायरा” आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

फक्त भारतच नाही जगाच्या पाठीवर पाकिस्तानचे अनेक शत्रू; यादीच आली समोर..

पोस्टरवर आपण आपल्या लाडक्या मराठी कलाकारांना पाहू शकतो. अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव, पूजा सावंत हे मराठी सिनेश्रुष्टीतील उत्तम कलाकार असून त्यांचं काम प्रेक्षकांनी अनुभवलंय आणि त्यांना भरपूर प्रेम सुद्धा दिलंय. पण विशेष आकर्षण ठरते ती म्हणजे लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सई सचिन गोडबोले. पोस्टर वरून अंदाजा येतो कि ह्या सिनेमाचं चित्रीकरण बाहेरदेशात केलं गेलाय. पण नक्की सई चं अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव आणि पूजा सावंत सोबतचं नातं काय? या कलाकारांची चित्रपटात काय भूमिका असणार आहे ? हे येत्या १६ मे २०२५ ला कळेल.

चीनमध्ये मोठी दुर्घटना! लिओनिंग रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, 22 जणांचा जळून कोळसा

यावेळी सुभाष घई ह्यांनी चित्रपटाविषयी बोलताना सांगितलं “मुक्ता आर्टस् चा नवा मराठी सिनेमा अमायरा १६ मे ला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मला आनंद आहे कि सिनेमा खूप चांगला बनवला गेला आहे, छान म्युजिक आहे, सर्वानी छान ऍक्टिंग केलंय. मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या कलेचा फॅन आहे. महाराष्ट्र ने मला सुरुवातीपासून खूप काय दिलं आहे त्यामुळे माझं हे कर्तव्य होतं कि मी त्याची परतफेड करू. तसेच मी २००६ पासून महाराष्ट्र सरकारच्या मदतीने फिल्म सिटीमध्ये व्हिसलिंगवुड्सची स्थापना केली. आमच्याकडे तब्बल ४००० संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रातील माजी विद्यार्थी आहेत जे चित्रपट निर्मितीत सध्या काम करत आहेत. आम्हाला व्हिसलिंगवुड्सच्या ऍक्टिंग स्टुडिओमधील आमची मुख्य अभिनेत्री सई गोडबोले हिचा अभिमान आहे. आम्ही मुक्ता आर्ट्स अंतर्गत एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘वळू’ देखील तयार केला. मी खूप खुश आहे कि आज मुक्ता आर्टस् च्या माध्यमातून आम्ही मराठी सिनेसृष्टीत जागा निर्माण करतोय. ‘अमायरा’ मध्ये दिग्दर्शक आणि सह निर्मात्यांनी उत्तम काम केलय. मी आशा करतो कि ह्या पुढे सुद्धा मी नव नवीन मराठी सिनिमे बनवत राहील.”

राज्यात नवे इलेक्ट्रिक वाहन धोरण, टोलमधूनही सूट देणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

अद्भुत आणि उत्तम कलाकारांसोबत सईची जुगलबंदी बघण्यासारखी असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक लोकेश गुप्ते हे असून लेखक मिहीर राजदा आहेत. तसेच राहुल पुरी, स्वाती खोपकर, सुरेश गोविंदराय पै निर्माते आहेत. तर सह निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेज पटेल आहेत. या सिनेमाला संगीत रोहित राऊत ने दिलं आहे. ‘अमायरा’ हा चित्रपट १६ मे २०२५ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

follow us