Download App

Box Office: ‘सालार’च्या बॉक्स ऑफिसची गाडी भरकटली? 15 व्या दिवशी झाली सर्वात कमी कमाई

Salaar Box Office Collection Day 15: प्रभासचा ‘सालार’ (Salaar Movie) चित्रपटगृहांवर राज्य करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून यासोबतच चित्रपटाने दमदार कमाई करत अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. हा चित्रपट आता रिलीजच्या तिसर्‍या आठवड्यात दाखल झाला असून बॉक्स ऑफिसवरही (Box Office Collection) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. ‘सालार’च्या कमाईत घट झाली आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाने रिलीजच्या 15व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला?


‘सालार’ने रिलीजच्या 15 व्या दिवशी किती कमाई केली? अॅक्शन-क्राइम थ्रिलर ‘सालार’ने 90 कोटींहून अधिक कमाई केली होती आणि यासोबतच या चित्रपटाने 2023 मधील सर्वात मोठ्या ओपनरचा विक्रम केला होता. यानंतर चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आणि मोठा व्यवसाय केला. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, ‘सालार’ने पहिल्या आठवड्यात 308 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात 70.1 कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट रिलीजच्या तिसर्‍या आठवड्यात आहे आणि यासोबतच ‘सालार’ रिलीजच्या तिसऱ्या शुक्रवारी म्हणजेच रिलीजच्या 15व्या दिवशी कमाईचे आकडेही आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सालार’ ने रिलीजच्या 15 व्या दिवशी 3.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासह, 15 दिवसांत ‘सालार’ची एकूण कमाई आता 381.60 कोटींवर पोहोचली आहे.

‘सालार’ने जगभरात किती कमाई केली? या चित्रपटाची जगभरातील कमाई विलक्षण आहे. व्यापार विश्लेषक मनोबाला विजय यांनी ‘सालार’च्या जागतिक कमाईचे आकडे समोर आले आहेत. यानुसार ‘सालार’ने रिलीजच्या 14 दिवसांत 659.69 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 15 व्या दिवशी हा चित्रपट 675 कोटींहून अधिक कमाई करेल असा अंदाज वर्तविला आहे.

अभिनेत्री उर्वशीची तब्येत बिघडली; थेट हॉस्पिटलमध्ये करावं लागलं भरती, कारण सांगत म्हणाली- मला….

‘सालार’ ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड मोडू शकला नाही: ‘सालार’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे आणि चांगली कमाईही झाली आहे, पण हा चित्रपट प्रभासच्या बाहूबली 2 चा विक्रम मोडू शकला नाही. ‘सालार’ने 15व्या दिवशी केवळ 3.50 कोटी रुपयांची कमाई केली, तर बाहुबली 2 ने रिलीजच्या 15व्या दिवशी 10.5 कोटी रुपयांची कमाई केली. अशा परिस्थितीत प्रभासचा हा चित्रपट त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबली 2 च्या कमाईच्या बाबतीत खूप मागे आहे.

follow us