Box Office Collection: ‘सालार’ समोर ‘डंकी’ फिका, जाणून घ्या चौथ्या दिवसाची कमाई

Box Office Collection: ‘सालार’ समोर ‘डंकी’ फिका, जाणून घ्या चौथ्या दिवसाची कमाई

Dunki Box Office Collection Day 4: शाहरुख खान (Shah Rukh Khan) आजकाल त्याच्या 2023 च्या तिसऱ्या चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. (Dunki Box Office Collection Day 4) 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याआधी ‘पठाण’ आणि ‘जवान’ असे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले होते. (Dunki Box Office) या दोन्ही चित्रपटांनी रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले, पण ‘डंकी’ हा अपयशी ठरला आहे. सध्या शाहरुख खानचा डंकी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हळूवार कामगिरी करत आहे. आजपर्यंत तो वर्षभरातील मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडू शकला नाही. अशा परिस्थितीत सिनेमाच्या चौथ्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल जाणून घ्या…

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)


राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 29.2 कोटींचा व्यवसाय केला. याला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पण, प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटाला कडवी टक्कर दिली जात असून, त्याचा थेट परिणाम शाहरुखच्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. ‘डंकी’ रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत आणि आता तो भारतात 100 कोटींचा व्यवसाय करण्यात यशस्वी झाला आहे.

सकनिल्‍कच्‍या रिपोर्टनुसार, चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी 31.50 कोटींचा गल्ला केला आहे. यानंतर चित्रपटाची एकूण कमाई आता 106.43 कोटींवर पोहोचली आहे. त्याचवेळी, ‘डंकी’च्या उर्वरित दिवसांच्या कलेक्शनवर नजर टाकली तर, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 29.2 कोटी, दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 25.61 कोटींचा व्यवसाय केला.

पहिल्या वीकेंडला ‘पठाण’ आणि ‘जवान’ला टक्कर देऊ शकला नाही

शाहरुखच्या ‘डंकी’ने चार दिवसांत १०० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी, अभिनेता त्याच्याच दोन चित्रपटांना टक्कर देऊ शकलेला नाही. पहिल्या वीकेंडमध्ये ‘पठाण’ आणि ‘जवान’च्या कमाईला देखील टक्कर देऊ शकला नाही. ‘जवान’ने रविवारी चौथ्या दिवशी 95.8 कोटींचा व्यवसाय केला आहे तर ‘पठाण’ने चौथ्या दिवशी 53.25 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘डंकी’ चौथ्या दिवशी केवळ 31 कोटींच्या कलेक्शनपर्यंतच मर्यादित राहिला आहे.

रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ची 24व्या दिवशी रेकॉर्डतोड कमाई; शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटांनाही टाकलं मागे

‘डंकी’चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. याआधी त्याने ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘पीके’ आणि ‘3 इडियट्स’ सारखे उत्तम चित्रपट केले होते, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण केले आहे. याशिवाय ‘डंकी’च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख व्यतिरिक्त तापसी पन्नू, बोमन इराणी, सतीश शाह, विकी कौशल आणि विक्रम कोचर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube