अभिनेत्री उर्वशीची तब्येत बिघडली; थेट हॉस्पिटलमध्ये करावं लागलं भरती, कारण सांगत म्हणाली- मला….
Urvashi Dholakia: टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. या फोटोत उर्वशी हॉस्पिटलच्या बेडवर बघायला मिळाली आहे. उर्वशीचा मुलगा क्षितिज याने हा फोटो हॉस्पिटलमधून पोस्ट केला आहे. (Urvashi Dholakia In Hospital) अभिनेत्रीच्या मानेमध्ये ट्यूमर झाल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तिच्यावर झालेली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. डॉक्टरांनी आता तिला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. उर्वशीला सध्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उर्वशी ‘कसौटी जिंदगी की’ मधील तिच्या नकारात्मक भूमिकेसाठी ओळखली जाते, जी कोमोलिकाची भूमिका होती. आजही चाहते तिला कोमोलिकाच्या व्यक्तिरेखेसाठी ओळखतात. यानंतर उर्वशीने टीव्हीचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा सीझन 6 जिंकला.
उर्वशीने तिच्या शस्त्रक्रियेबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, “डिसेंबर 2023 च्या सुरुवातीला मानेमध्ये ट्यूमर (सिस्ट) आढळून आल्याने मला शस्त्रक्रिया करावी लागली. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि आता मला १५ ते २० दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.” उर्वशीचा मुलगा क्षितिजने हॉस्पिटलमधून आईचा व्हिडिओ शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर ती सतत हॉस्पिटलचे व्हिडिओ पोस्ट करत असते.
सिनेसृष्टीवर मोठी शोककळा! विमान अपघातात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा 2 मुलींसह मृत्यू
उर्वशी सिंगल मदर असून तिला दोन मुले आहेत. क्षितिज आणि सागर अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. अलीकडेच सिद्धार्थ काननला दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशीने तिच्या वयक्तिक आयुष्याविषयी सांगितले. वयाच्या १८ व्या वर्षी घटस्फोट झाल्याचे तिने सांगितले. पण ती तिच्या पतीशी कधीच बोलली नाही किंवा तिला त्याच्याबद्दल काही जाणून घ्यायचे नाही.
उर्वशीने पुढे सांगितले की, तिच्या दोन्ही मुलांना त्यांच्या वडिलांबद्दल काहीही माहिती नाही. अभिनेत्री म्हणाली, “त्यांना देखील त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे नाही.” आम्ही त्याला त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो नेहमी म्हणाला, ‘आम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे नाही.